Suryakumar Yadav Six Video: सूर्याच्या सिक्सरने फोडला मैदानातला फ्रिज, तुम्ही पाहिलात 'हा' फटका?

सूर्याने पहिल्याच चेंडूवर तो षटकार लगावला होता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 10:20 PM2022-09-09T22:20:39+5:302022-09-09T22:21:07+5:30

whatsapp join usJoin us
Suryakumar Yadav No Look Six breaks down refrigerator in Afghanistan camp on ground Asia Cup 2022 IND vs AFG | Suryakumar Yadav Six Video: सूर्याच्या सिक्सरने फोडला मैदानातला फ्रिज, तुम्ही पाहिलात 'हा' फटका?

Suryakumar Yadav Six Video: सूर्याच्या सिक्सरने फोडला मैदानातला फ्रिज, तुम्ही पाहिलात 'हा' फटका?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2022 मध्ये भारतीय संघाने विजयासह आपल्या स्पर्धेचा शेवट गोड केला. दुबईच्या मैदानावर गुरुवारी झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा १०१ धावांनी पराभव केला. भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला विराट कोहली. त्याने जवळपास तीन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर शतक झळकावले. विराट कोहलीने ६१ चेंडूत नाबाद १२२ धावा केल्या. या सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादवने आपल्या दणकेबाज फटक्याने चांगलीच वाहवा मिळवली. त्याच्या षटकाराने थेट मैदानावरचा फ्रीजच फोडला.

केएल राहुलनंतर क्रीजवर आलेल्या सूर्यकुमारने पहिल्याच चेंडूवर 'नो-लूक सिक्स' मारला. हा फटका इतका तडाखेबाज होता की चेंडू सीमारेषेच्या बाहेर अफगाणिस्तान संघासाठी ठेवलेल्या फ्रीजला लागला. त्यामुळे फ्रीजच्या वरची अख्खी पट्टीच खाली पडली आणि फ्रिज खराब झाला. मात्र, सूर्यकुमार यादवला हा डाव पुढे नेता आला नाही. पुढच्याच चेंडूवर वेगवान गोलंदाज फरीद अहमदने त्याला क्लीन बोल्ड केले. सूर्यकुमार यादवने दोन चेंडू खेळून एकूण ६ धावा केल्या. पण त्याच्या सिक्सरची चांगलीच चर्चा रंगली. पाहा त्याचा व्हिडीओ-

सूर्यकुमार यादव अलीकडच्या काळात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. आशिया चषक २०२२ मध्ये सूर्यकुमार यादवने हाँगकाँगविरुद्ध खळबळ उडवून दिली होती. त्या सामन्यात सूर्यकुमार यादवने अवघ्या २६ चेंडूत ६८ धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवने २६१.५४ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. या इनिंगमध्ये सूर्याच्या बॅटमधून ६ चौकार आणि ६ षटकार निघाले होते. विशेष बाब म्हणजे यातील चार षटकार सूर्याने शेवटच्या षटकात मारले होते.

अफगाणिस्तानविरूद्ध सूर्या तपळला नसला तरी विराटने शतक ठोकलं. राहुलने कोहलीसोबत पहिल्या विकेटसाठी ७६ चेंडूत ११९ धावांची भागीदारी केली. राहुल ६२ धावांवर बाद झाला. पण दुसरीकडे, विराट कोहलीने अतिशय आक्रमक खेळत ५३ चेंडूत शतक झळकावले. कोहलीने ६१ चेंडूत १२ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद १२२ धावांची खेळी केली. नोव्हेंबर २०१९ नंतरचे हे त्याचे पहिले आणि कारकिर्दीतील ७१वे शतक ठरले. कोहली व्यतिरिक्त सामन्यात भुवनेश्वर कुमारनेही चमक दाखवत, ४ धावांत ५ बळी टिपले.

Web Title: Suryakumar Yadav No Look Six breaks down refrigerator in Afghanistan camp on ground Asia Cup 2022 IND vs AFG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.