Join us  

Suryakumar Yadav Six Video, IND vs SL: अजब गजब सिक्स! सूर्यकुमार यादव जमिनीवर पडला पण तरीही मारला सणसणीत षटकार

असा सिक्सर पण खेळाडूच नव्हे तर नेटकरीही चक्रावून गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 11:00 PM

Open in App

Suryakumar Yadav Six Video, IND vs SL 3rd T20: सूर्यकुमार यादवचे धडाकेबाज शतक आणि भारतीय गोलंदाजांची शिस्तबद्ध कामगिरी यांच्या बळावर टीम इंडियाने श्रीलंकेच्या संघावर ९१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने ही टी२० मालिकादेखील २-१ अशी जिंकली. सूर्यकुमार यादवने ७ चौकार आणि ९ षटकारांच्या साथीने नाबाद ११२ धावा चोपल्या. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीर निवडण्यात आले. तर अक्षर पटेलने केलेल्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला मालिकावीराचा किताब देण्यात आला. सूर्यकुमारची आजची तुफानी खेळी नक्कीच साऱ्यांच्या लक्षात राहिल. पण त्यापेक्षाही जास्त लक्षात राहिल तो त्याने मारलेला अजब-गजब सिक्सर...

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताच्या 'यंग ब्रिगेड'ने मालिका जिंकली. या मालिकेतील निर्णायक सामन्यात उपकर्णधार सूर्यकुमार झंझावाती फलंदाजी केली. त्याने ५१ चेंडूमध्ये तब्बल ११२ धावा कुटल्या. इशान किशन एक धाव काढून आणि राहुल त्रिपाठी ३५ धावा काढून माघारी गेल्यानंतर सूर्यकुमारने ताबा घेतला. त्याने अक्षरश: गोलंदाजांची धुलाई केली. त्याने समोरच्या रेषेत तर फटके मारलेच पण फुलटॉस चेंडूवर त्याने लगावलेला षटकार विशेष वाहवा मिळवून गेला, पाहा तो षटकार-

--

दरम्यान, सू्र्याने ७ चौकार आणि ९ षटकारांच्या साथीने नाबाद ११२ धावा चोपल्या आणि अक्षर पटेलने ९ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद २१ धावा करत संघाला २२८ धावांपर्यंत पोहोचवले. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. त्यानंतर त्यांना सावरताच आले नाही. पाथुम निसांका १५ धावांवर बाद झाला. कुसल मेंडिस देखील २३ धावा काढून माघारी परतला. या दोंघाच्या बाद होण्यानंतर श्रीलंकेच्या डावाल गळतीच लागली. अविष्का फर्नांडो १ धाव काढून बाद झाला. धनंजय डिसिल्वाने २२, चरिथ असालांकाने १९, दसुन शनाकाने २३ धावा करत संघर्ष करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. हसरंगा ९ धावांवर , करूणरत्ने शून्यावर, महेश तिक्षणा २ धावांवर तर मदुशंकाने १ धाव काढून बाद झाला.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकासूर्यकुमार अशोक यादवभारतीय क्रिकेट संघसोशल मीडियासोशल व्हायरल
Open in App