Join us  

asia cup 2023 : "वन डे फॉरमॅट सर्वात आव्हानात्मक पण...", आशिया चषकासाठी सूर्यानं सांगितली रणनीती

asia cup 2023 schedule : ३० ऑगस्टपासून अर्थात उद्यापासून बहुचर्चित आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरूवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 1:46 PM

Open in App

Suryakumar Yadav on ODI Format Batting : ३० ऑगस्टपासून अर्थात उद्यापासून बहुचर्चित आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरूवात होत आहे. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर ही स्पर्धा पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानात पार पडणार आहे. सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुल्तान येथे खेळवला जाईल. तर, २ सप्टेंबर रोजी भारतीय संघ पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातून आपल्या मोहिमेची सुरूवात करेल. आगामी स्पर्धा भारताचा ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवसाठी 'अग्निपरीक्षा' असणार आहे. कारण ट्वेंटी-२० क्रिकेटच्या तुलनेत सूर्याची वन डे क्रिकेटमधील आकडेवारी लज्जास्पद आहे. 

सूर्यकुमार हा ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला जगातील नंबर वन फलंदाज आहे पण त्याला वन डे क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करण्यात अपयश आलं. आता चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा श्रेयस अय्यर परतल्याने सूर्यकुमारला नव्या भूमिकेत उतरावं लागणार आहे. आशिया चषकासाठी भारतीय संघात सूर्याचा समावेश आहे. सूर्यकुमारने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना आगामी स्पर्धेबद्दल आपली रणनीती सांगितली. "मला जी भूमिका सोपवली जाईल ती पूर्ण करायची आहे, ज्यामध्ये मी चांगली कामगिरी करण्यास उत्सुक आहे", असं त्यानं म्हटलं. 

प्रत्येकजण म्हणत आहे की, मी ट्वेंटी-२० मध्ये चांगली कामगिरी करत आहे. पण, दोन्ही फॉरमॅटमध्ये पांढरा चेंडू वापरला जातो तर मला ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये यश का मिळत नाही. मी सराव करत असून, माझ्या मते हा फॉरमॅट सर्वात आव्हानात्मक आहे, असंही सूर्यकुमारनं सांगितलं.  सूर्यानं सांगितली रणनीती तसेच वन डे फॉरमॅटमध्ये समतोल राखणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच मी खूप सराव करत आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी याबद्दल मी बोलत आहे. आशा आहे की, स्पर्धा जसजशी पुढे जाईल तसतसा मला या फॉरमॅटमध्ये यशस्वी होण्याचा मार्ग सापडेल, असं त्यानं आणखी सांगितलं.  आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा. (राखीव खेळाडू - संजू सॅमसन) 

आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - ३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल 

टॅग्स :एशिया कप 2023सूर्यकुमार अशोक यादवरोहित शर्माविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ
Open in App