mumbai indians team 2023 । मुंबई : भारतीय संघ मायदेशात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी सूर्यकुमार यादवचा संघात समावेश होता. मात्र, सूर्याचे कसोटी क्रिकेटमधील पदार्पण निराशाजनक झाले. त्याला साजेशी खेळी करण्यात अपयश आले. तरीदेखील भारताने 2 सामने जिंकून 2-1 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटीनंतर सूर्यकुमार यादव संघाबाहेर झाला असून तो सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे.
दरम्यान, मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सूर्यकुमार यादव गल्ली क्रिकेटचा आनंद घेत आहे. तसेच या शॉर्टवर चाहत्यांनी लय भारी, एक नंबर भावा, मस्तच शॉर्ट अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. 31 मार्चपासून या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. आयपीएलचा पहिला सामना गतविजेत्या गुजरात जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.
IPL 2023 साठी मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, जोफ्रा आर्चर, टीम डेव्हिड. डेवॉल्ड ब्रेव्हिस, जसप्रीत बुमराह, हृतिक शोकिन, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, तिलक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेया, आकाश माधवाल, त्रिस्तान स्तब्स, रमणदीप सिंग, कॅमेरून ग्रीन, झाय रिचर्डसन, राघव गोयल.
आयपीएल 2023साठी मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक -
- 2 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू - सायंकाळी 7.30 वा. पासून
- 8 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई - सायंकाळी 7.30 वा. पासून
- 11एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली - सायंकाळी 7.30 वा. पासून
- 16 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई - दुपारी 3.30 वा.पासून
- 18 एप्रिल - स नरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद - सायंकाळी 7.30 वा.पासून
- 22 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, मुंबई - सायंकाळी 7.30 वा.पासून
- 25 एप्रिल- गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, अहमदाबाद - सायंकाळी 7.30 वा.पासून
- 30 एप्रिल- मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई - सायंकाळी 7.30 वा.पासून
- 3 मे - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, मोहाली - सायंकाळी 7.30वा.पासून
- 6 मे - चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई - दुपारी 3.30 वा. पासून
- 9 मे - मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई - सायंकाळी 7.30 वा.पासून
- 12 मे - मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स, मुंबई - सायंकाळी 7.30 वा.पासून
- 16 मे - लखनौ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स लखनौ, - सायंकाळी 7.30 वा.पासून
- 21 मे - मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, मुंबई - दुपारी 3.30 वा.पासून
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"