Video: सूर्यकुमारने जिंकली चाहत्यांची मनं, त्याची कृती पाहून तुम्हीही कराल वाहवा!

भारताचा उद्या आफ्रिकेविरूद्ध पहिला टी२० सामना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 11:39 AM2022-09-27T11:39:02+5:302022-09-27T11:39:49+5:30

whatsapp join usJoin us
Suryakumar Yadav shows Sanju Samson picture from team bus in Trivandrum leaves fans overjoyed wins hearts Watch Video | Video: सूर्यकुमारने जिंकली चाहत्यांची मनं, त्याची कृती पाहून तुम्हीही कराल वाहवा!

Video: सूर्यकुमारने जिंकली चाहत्यांची मनं, त्याची कृती पाहून तुम्हीही कराल वाहवा!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Suryakumar Yadav, IND vs SA T20I: भारतीय संघाने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी२० मालिका जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा टीम इंडियाचा घरच्या मैदानावर सलग १०वा टी२० मालिका विजय ठरला. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १८६ धावा केल्या. टीम डेव्हिड आणि कॅमेरॉन ग्रीन या दोघांनी अर्धशतके ठोकत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. पण सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना आणि मालिका जिंकली. टी२० वर्ल्ड चॅम्पियन्सना हरवल्यानंतर आता भारताची दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ३ सामन्यांची टी२० मालिका आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ तिरूवअनंतपुरम (त्रिवेंद्रम) मध्ये पोहोचला. तेथे सूर्यकुमार यादवने चाहत्यांची मनं जिंकणारी कृती केली.

आफ्रिकेविरूद्ध पहिला सामना उद्या त्रिवेंद्रम येथे होणार आहे. या सामन्यासाठी भारताचा संघ शहरात दाखल झाला तेव्हा साहजिकच चाहत्यांनी त्यांना गराडा घातला. संघाचे खेळाडू टीमच्या बसमध्ये होते, पण बाहेर लोकल बॉय संजू सॅमसनच्या नावाने जयघोष सुरू झाला. महत्त्वाची बाब म्हणजे, संजू सॅमसन या संघाचा भाग नसूनही त्याच्या नावाने फॅन्स जयघोष करू लागले. ते पाहताच सूर्यकुमार यादवने बसच्या आतूनच चाहत्यांच्या गर्दीला संजू सॅमसनचा फोटो दाखवला. संजूला भारताच्या संघात टी२० वर्ल्ड कपसाठी स्थान मिळाल्याने त्याचे चाहते काहीसे नाराज आहेत. पण जेव्हा संजूच्या नावाचा जयघोष झाला, तेव्हा सूर्याने त्याचा फोटो दाखवत साऱ्या चाहत्यांना खुश केले.

सूर्यकुमारने दाखवला संजू सॅमसनचा फोटो, पाहा Video-

दरम्यान, आफ्रिकेविरूद्धचा भारताचा पहिला सामना उद्या होणार आहे. तर दुसरा सामना गुवाहाटीला २ ऑक्टोबरला आणि तिसरा सामना ४ ऑक्टोबरला इंदोर येथे होणार आहे. या मालिकेत हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी शाहबाज अहमदला संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच श्रेयस अय्यरलाही संधी मिळाली आहे.

भारताचा संघ- रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, शाहबाज नदीम, श्रेयस अय्यर

Web Title: Suryakumar Yadav shows Sanju Samson picture from team bus in Trivandrum leaves fans overjoyed wins hearts Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.