Join us  

Suryakumar yadav, IND vs SL 3rd T20: दे घुमा के.... सूर्यकुमार यादवचा श्रीलंकन गोलंदाजांना 'दे धक्का'; T20 मध्ये केला मोठा पराक्रम

सूर्यकुमार यादवने ४५ चेंडूत ठोकलं तुफानी शतक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 8:28 PM

Open in App

Suryakumar yadav, IND vs SL 2nd T20: भारतीय फलंदाजांनी तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात तुफान कामगिरी केली. सलामीवीर इशान किशन लवकर बाद झाल्यानंतर सामन्यात गोलंदाज वरचढ ठरतील असे वाटत होते. पण राहुल त्रिपाठीने झटपट ३५ दावांची खेळी करत भारताला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करण्यास मदत केली. तो बाद झाल्यानंतर मग भारताचा उपकर्णधार सूर्यकुमार यादवने डावाचा ताबा आपल्या हातात घेत जोरदार धुलाईला सुरूवात केली. सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीपुढे श्रीलंकेचे गोलंदाज अक्षरश: हतबल झाल्याचे दिसून आले. सूर्यकुमारने तिसरे टी२० शतक ठोकले. त्याने ४५ चेंडूत १०० धावा केल्या.

सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम

सूर्यकुमार यादव जेव्हा मैदानात आला तेव्हा पॉवरप्ले संपला होता. त्यामुळे सावधपणे डाव पुढे नेण्याची भारताची भूमिका होती. पण सूर्यकुमारने मात्र खेळपट्टीचा अंदाज घेतला आणि मग जोरदार धुलाई सुरू केली. सगळ रेषेतील फटके तर त्याने मारलेच पण त्यासोबतच लॅप शॉट मारून त्याने वेगवान गोलंदाजांची सारी हवाच काढून टाकली. चेंडू थोडा जरी अंगावर आला तरी सूर्यकुमार यादव त्या चेंडूवर लॅप शॉट मारताना दिसला. त्यानंतर गोलंदाजाने लाईन बदलली तर सुर्यकुमाकर सरळ रेषेत किंवा आडव्या बॅटने फलंदाजी करत होता. त्यामुळे श्रीलंकेचे गोलंदाज हतबल दिसले. याच दरम्यान सूर्यकुमार यादवने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सूर्याने ४४ सामन्यांच्या ४२ डावांमध्ये १४६६ धावा केल्या होत्या. आज त्याने दमदार शतक ठोकत १५०० धावांचा टप्पा ओलांडला.

असा रंगला भारताचा डाव

प्रथम फलंदाजी करताना भारताचा इशान किशन १ धाव काढून बाद झाला. त्यानंतर नवख्या राहुल त्रिपाठीने १६ चेंडूत तुफानी ३५ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने दमदार खेळी केली. शुबमन गिलच्या साथीने त्याने अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतरही तो फटकेबाजी करतच राहिला. शुबमन गिलचे अर्धशतक हुकले. तो ४४ धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्या, दीपक हु़ड्डा दोघेही स्वस्तात बाद झाले पण सूर्यकुमारने मात्र तिसरे टी२० शतक ठोकले. त्याने ४५ चेंडूत १०० धावा केल्या.  

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकासूर्यकुमार अशोक यादवहार्दिक पांड्या
Open in App