Suryakumar Yadav T20 WC: टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना करण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. गुरुवारी ॲडलेडमध्ये दोन्ही संघ आमने-सामने असतील. भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव चर्चेचा विषय ठरला आहे. सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. सूर्यकुमार यादव जे करत आहे ते फार कमी लोक करू शकतात, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज शेन वॉटसननं केलंय.
सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत सूर्यकुमार यादव हा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. यानंतर शेन वॉटसननं सूर्यकुमारचं कौतुकही केलं. सूर्याला फलंदाजी करताना पाहणं जबरदस्त आहे. आपण त्याला आयपीएलमध्येही फॉलो करतो, असंही त्यानं म्हटलं.
“आयपीएलमध्ये जे केलं ते त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणं सोपं नाही. ऑस्ट्रेलियासारख्या देशात येऊन धावा करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. बॉलिंग ओळखणं आणि त्याच्यानुसार फटकेबाजी करणं मजेशीर आहे. फिल्डर्सनुसार फटकेबाजी करणं, ऑस्ट्रेलियासारख्या मोठ्या मैदानांमध्ये धावा करणं सोपी गोष्टी नाही,” असं वॉटसन म्हणाला. सूर्यकुमारनं या विश्वचषक सामन्यात कमाल केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 5 सामन्यांत त्यानं 225 धावा केल्यात. यादरम्यान त्याचा स्ट्राईकरेट 200 चा आहे. या स्पर्धेत त्यानं तीन अर्धशतकंही झळकावली आहेत.
झिम्बाब्वेविरोधात तुफान खेळी
ग्रुप स्टेजमधील अखेरच्या झिम्बाब्वेविरोधातील सामन्यात सूर्यकुमारनं 25 चेंडूंमध्ये 61 धावा केल्या होत्या. यामध्ये त्यानं तुफान फटकेबाजी केली होती. त्याच्या फटकेबाजीसमोर गोलंदाजांनीही लोटांगण घातल्याचं दिसून आलं होतं.
Web Title: suryakumar yadav t20 world cup australia shane watson comment on indian batter t20 world cup 2022 ind vs zim ipl india
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.