Join us  

ऋतुराज शर्यतीतून बाद, सूर्यकुमारकडे ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व जाणार; इशान, प्रसिद्धही खेळणार

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची सुरावात अन् शेवटही भारत-ऑस्ट्रेलिया लढतीने होणार आहे... वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतरही IND vs AUS थरार पाहायला मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 4:15 PM

Open in App

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची सुरावात अन् शेवटही भारत-ऑस्ट्रेलिया लढतीने होणार आहे... वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतरही IND vs AUS थरार पाहायला मिळणार आहे. उभय संघांवर पाच ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत हार्दिक पांड्याकडे नेतृत्व असेल हे निश्चित होते, परंतु दुखापतीमुळे त्याला दोन महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. २३ नोव्हेंबरपासून ही मालिका सुरू होतेय आणि त्यासाठी युवा खेळाडूंची निवड केली जाईल, हे निश्चित आहे. निवड समिती लवकरच बैठक बोलावून संघ जाहीर करणार आहे. 

 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद शमी,  जसप्रीत बुमराह या सिनियर खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याचा अंदाज आहे. हार्दिकच्या गैरहजेरीत नेतृत्व कोणाकडे जाईल याची उत्सुकता होती. आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता ऋतुराज गायकवाड व जागतिक ट्वेंटी-२० क्रमवारीतील नंबर १ फलंदाज सूर्यकुमार यादव यांचा नावे चर्चेत होती. पण, आता हाती आलेल्या बातमीनुसार सूर्यकुमारकडे निवड समिती या मालिकेसाठी कर्णधारपद सोवपणार आहे. ३३ वर्षीय सूर्याने मुंबईच्या संघाचे नेतृत्व सांभाळले आहे शिवाय भारताच्या २३ वर्षांखालील संघाचा काही वर्षांपूर्वी तो कर्णधार होता. 

वर्ल्ड कप संघातील सदस्य असलेल्या, परंतु खेळण्याची संधी न मिळालेल्या इशान किशन व प्रसिद्ध कृष्णा यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत संधी मिळणार आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ वर्ल्ड कपनंतर संपतोय आणि त्यावर पुढील निर्णय होईपर्यंत व्ही व्ही एस लक्ष्मणकडे प्रशिक्षकाची जबाबदारी असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय संघ तीन ट्वेंटी-२० व तीन वन डे संघाच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे. त्याही दौऱ्यावर पांड्या खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे सूर्यकुमारची निवड करण्यात येईल.  

या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा ट्वेंटी-२० संघ - मॅथ्यू वेड ( कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, सीन एबॉट, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा  

मालिकेचे वेळापत्रक ( Schedule ) पहिली ट्वेंटी-२० - २३ नोव्हेंबर, विशाखापट्टणमदुसरी ट्वेंटी-२० - २६ नोव्हेंबर, तिरुअनंतपूरमतिसरी ट्वेंटी-२० - २८ नोव्हेंबर, गुवाहाटीचौथी ट्वेंटी-२० - १ डिसेंबर, नागपूरपाचवी ट्वेंटी-२० ३ डिसेंबर, हैदराबाद 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासूर्यकुमार अशोक यादवइशान किशनहार्दिक पांड्या