Join us  

IND vs WI 3rd T20 : Suryakumar Yadav - Venkatesh Iyer ने मोडला १५ वर्षांपूर्वीचा विक्रम! वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची तुफान धुलाई करत Yuvraj Singh - MS Dhoni चा विक्रम काढला मोडीत

रोहित शर्मा बाद झाल्यावर सुर्यकुमार अन् वेंकटेश अय्यरने गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 4:08 PM

Open in App

IND vs WI 3rd T20 : Rohit Sharma च्या टीम इंडियाने पोलार्डच्या वेस्ट इंडिजला तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत व्हाईटवॉश दिला. वन डे पाठोपाठ टी२० मालिकेतही वेस्ट इंडिजला ३-०ने पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाकडून ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा हे चौघे फारशी फटकेबाजी करू शकले नाहीत. पण Suryakumar Yadav आणि Venkatesh Iyer या जोडीने तुफान फटेकेबाजी केली. त्यांनी शेवटच्या टप्प्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचं अक्षरश: कंबरडं मोडलं. इतकंच नव्हे तर या सूर्या-वेंकटेश जोडगोळीने तब्बल १५ वर्ष जुना विक्रम मोडत नवा विक्रम प्रस्थापित केला.

भारतीय संघाच्या डावाची सुरूवात खराब झाली होती. ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन या दोघांनी डावाची सुरूवात केली. पण ऋतुराज (४) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर इशान किशन (३४), श्रेयस अय्यर (२५) आणि रोहित शर्मा (७) झटपट माघारी परतले. त्यामुळे भारतीय संघाची अवस्था १५ षटकांअखेरीस ४ बाद ९८ होती. पण त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर जोडीने शेवटच्या ५ षटकात तब्बल ८६ धावा कुटल्या. भारतीय संघाने टी२० सामन्यात एखाद्या संघाविरूद्ध कुटलेल्या या शेवटच्या ५ षटकातील सर्वाधिक धावा आहेत.

युवराज-धोनीचा विक्रम मोडीत काढला!

भारताच्या युवराज सिंग - महेंद्रसिंग धोनी जोडीने २००७ साली टी२० विश्वचषकात इंग्लंडविरूद्ध आफ्रिकेतील डर्बनच्या मैदानावर शेवटच्या पाच षटकात ८० धावा कुटल्या होत्या. त्याच सामन्यात युवराजने स्टुअर्ट ब्रॉडला ६ चेंडूत ६ षटकार लगावत १२ चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. मात्र, रविवारी वेस्ट इंडिजविरूद्ध या विक्रम मोडीत निघाला. सूर्यकुमार आणि वेंकटेश अय्यर या दोघांनी तुफानी फटकेबाजी करत शेवटच्या पाच षटकात ८५ धावा केल्या. डावाच्या शेवटच्या चेंडूवर सुर्यकुमार बाद झाला.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजसूर्यकुमार अशोक यादववेंकटेश अय्यरमहेंद्रसिंग धोनी
Open in App