Join us  

IND vs SL: चाहत्यांनी सूर्यकुमारला विचारले, आमचा 'संजू' कुठे आहे? फलंदाजाच्या उत्तरानं जिंकली मनं, Video  

टीम इंडियाने आणखी एका वनडे मालिकेवर कब्जा केला. भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या वन डेत श्रीलंकेचा ३१७ धावांनी पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 5:28 PM

Open in App

टीम इंडियाने आणखी एका वनडे मालिकेवर कब्जा केला. भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या वन डेत श्रीलंकेचा ३१७ धावांनी पराभव केला. या विजयात विराट कोहली, शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांचा सर्वात मोठा वाटा होता. विराटने ११० चेंडूत १३ चौकार आणि ८ षटकार मारत १६६ धावा केल्या. गिलने ९७ चेंडूत ११६ धावांच्या खेळी साकारताना १४  चौकार आणि २ षटकार खेचले. त्यानंतर सिराजने भेदक गोलंदाजी करून चार विकेट्स घेतल्या व श्रीलंकेचा संपूर्ण संघ ७३ धावांवर माघारी पाठवला. या सामन्यात सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये हार्दिक पांड्याच्या जागी संधी मिळाली. यावेळी सीमारेषेवर फिल्डिंग करताना चाहत्यांनी त्याला प्रश्न केला अन् त्यानं मन जिंकणारं उत्तर दिलं.

टीम इंडियाचे मिशन 'नंबर वन'! न्यूझीलंडकडून हिसकावून घ्यायचाय ताज, पाहा संपूर्ण वेळापत्रक

 टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसन आंतरराष्ट्रीय सामने खेळो किंवा न खेळो, चाहते संजूसाठी नेहमीच वेडे असतात. असेच  दृश्य श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्‍या वन डे सामन्यादरम्यान पाहायला मिळाले, त्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा व्हायरल झाला असून प्रत्येकजण तो शेअर करत आहे. टीम इंडियाने वन डे मालिकेपूर्वी श्रीलंकेविरुद्ध ३ सामन्यांची  ट्वेंटी-२० मालिकाही खेळली होती, या मालिकेच्या पहिल्या सामन्यात संजूला दुखापत झाली होती आणि उर्वरित २ सामन्यांमधून तो बाहेर पडला होता. त्यानंतर त्याच्या जागी जितेश शर्माची संघात निवड झाली, मात्र त्याला अंतिम ११ मध्ये संधी मिळाली नाही.

काल टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात शेवटचा वन डे सामना तिरुअनंतपुरम येथे खेळला गेला. संजू सॅमसनचे हे होम ग्राऊंड आहे.  यादरम्यान काही चाहत्यांनी सूर्यकुमार यादवला विचारले - आमचा संजू कुठे आहे? ज्यावर SKY ने हृदयाच्या इथे हात केला आणि सांगितले की तो माझ्या हृदयात आहे. त्यावर चाहते सूर्यावर खूपच खूश झाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकासूर्यकुमार अशोक यादवसंजू सॅमसन
Open in App