दुबई : फॉर्ममध्ये असलेला सूर्यकुमार यादव याने बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी टी-२० क्रमवारीत दुसरे स्थान कायम राखले. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान अव्वल स्थानावर आहे. सूर्याचे ८३८ गुण असून, आघाडीच्या दहा फलंदाजांमध्ये असलेला भारताचा तो एकमेव खेळाडू आहे.
लोकेश राहुल १३व्या, विराट कोहली १४ आणि कर्णधार रोहित शर्मा १६व्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडचा डीवोन कॉन्वे हा आघाडीच्या पाच फलंदाजांमध्ये आला. त्याने तिसऱ्या स्थानावर झेप घेताना ऑस्ट्रेलियाचा ॲरोन फिंच आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मलान यांना मागे टाकले. रिझवान, सूर्या आणि बाबर आझम पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्कराम चौथ्या स्थानावर आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने दक्षिण आफ्रिकेचा २-१ ने पराभव केल्यानंतरही कर्णधार शिखर धवन हा क्रमवारीत १७व्या स्थानी घसरला. कोहली सातव्या, तर रोहित आठव्या स्थानावर आले.
श्रेयस अय्यर (३३) आणि संजू सॅमसन (९३) यांना काही प्रमाणात फायदा झाला. डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव गोलंदाजीत २५व्या स्थानावर आला. जसप्रीत बुमराह दहाव्या, तर युझवेंद्र चहल २०व्या स्थानावर आहे.