ठळक मुद्देकोहलीच्या व्हिडिओवर सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिलीआयपीएलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले होते विराट आणि सूर्यकुमारभारतीय संघात निवड न झाल्यानं नराज होता सूर्यकुमार
नवी दिल्ली
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने सातत्यपूर्ण कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तरीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात त्याला जागा मिळू शकली नाही. संघात निवड न झाल्यानं सूर्यकुमार नाराज असल्याचं बोललं जात होतं. विराट कोहलीबाबतच्या एका वादग्रस्त ट्विटला सूर्यकुमारने लाइक केल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या आणि तो नाराज असल्याचं निष्पन्न झालं होतं. पण यावेळी सूर्यकुमारने विराट कोहलीच्या एका व्हिडिओवर जबरदस्त प्रतिक्रिया देत पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या ट्विटर हँडलवर ऑस्ट्रेलियात फलंदाजीच्या सराव सत्राचा एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओत विराट वेगवान गोलंदाजीचा आक्रमकपणे सामना करताना दिसत आहे. कोहलीच्या या व्हिडिओवर सूर्यकुमार यादवने प्रतिक्रिया दिली. 'जबरदस्त ताकद, बॅटमधून येणारा खणखणीत आवाज आणि आक्रमकत पाहण्यासाठी मी उत्सुक आहे', अशा आशयाचं ट्विट सूर्यकुमार यादवनं केलं आहे.
सूर्यकुमार यादवने या प्रतिक्रियेतून विराट आणि त्याच्यात सारंकाही आलबेल असल्याचं दाखवून दिलं आहे. यासोबत भारतीय संघाच्या कर्णधाराबाबत सन्मान असल्याचंही त्याच्या ट्विटमधून दिसून येतं.
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात विराट-सूर्यकुमार एकमेकांसमोर आल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर सूर्यकुमारने अखेरच्या षटकापर्यंत मैदानात उभं राहून संघाला विजय प्राप्त करुन दिला होता. विजयाचं सेलिब्रेशन करताना सूर्यकुमारने आपल्या हावभावातून भारतीय संघात निवड न झाल्याबाबत प्रतिक्रिया दिली होती. आयपीएलच्या मागील तीन मोसमात सूर्यकुमार यादवने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सूर्यकुमारने १५ सामन्यांत ४० च्या सरासरीने ४८० धावा कुटल्या आहेत. यात ४ दमदार अर्धशतकांचा समावेश आहे आणि १४५ च्या स्ट्राइकरेटने त्यानं फलंदाजी केली आहे.
Web Title: Suryakumar Yadav's strong reaction to Virat Kohli's 'that' video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.