Join us

अक्षर पटेल होणार बाबा; 'बापू'च्या पोस्टवर 'सूर्या'च्या पत्नीची भारी प्रतिक्रिया, चाहते म्हणाले...

स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल लवकरच बाबा होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 12:45 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल लवकरच बाबा होणार आहे. त्याने पत्नीसोबतचा एक व्हिडीओ शेअर करुन ही माहिती दिली. अक्षर पटेलची पत्नी मेहा पटेल ही प्रेग्नंट असून क्रिकेटरने खास पोस्ट शेअर करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. खास पोस्टमध्ये त्याने पत्नी मेहालाही टॅग केल्याचे दिसून येते. अक्षर पटेल हा 'बापू' या नावाने लोकप्रिय आहे. त्यामुळे टीम इंडियातील 'बापू' लवकरच बाबा होणार आहे, ही गोष्ट आता स्पष्ट झाली आहे. २६ जानेवारी २०२३ मध्ये अक्षर पटेल आणि मेहा यांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती. अक्षरने शेअर केलेल्या पोस्टवर सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा शेट्टीने कमेंट केली, ज्यावर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या.

दरम्यान, २६ जानेवारी २०२३ मध्ये अक्षर पटेल आणि मेहा यांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती. अक्षर आणि मेहा यांची लव्हस्टोरीही एकदम झक्कास आहे. अनेक वर्षे डेट केल्यावर दोघांनी प्रेमाची भागीदारी एकत्ररित्या फुलवण्याचा निर्णय घेतला. अक्षर पटेल हा टीम इंडियातील एक प्रमुख खेळाडू आहे. तर त्याची पत्नी मेहा एक न्यूट्रिशनिस्ट आहे.

अक्षर पटेलने पत्नी मेहा पटेलसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला. यावर सूर्याची पत्नी देविशा शेट्टीने 'अभिनंदन' अशा आशयाची कमेंट केली. देविशाच्या पोस्टवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट करताना 'तुम्ही कधी खुशखबर देणार' अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या. अलीकडेच सूर्यकुमार यादवने कपिल शर्माच्या शोमध्ये बोलताना याप्रकरणी भाष्य केले होते. 

सूर्याची जोरदार बॅटिंग"विश्वचषकाची ट्रॉफी मधोमध ठेवून नवरा-बायको झोपलेले दिसत आहेत... सूर्या तुझ्या घरच्यांनी असे सांगितले नाही का की, ही ट्रॉफी दोन दिवसांनी बीसीसीआयच्या ऑफिसमध्ये जाईल. मग तुम्ही दोघे मिळून एक पर्मनंट ट्रॉफी आणा जी नेहमी सोबत असेल", कपिल शर्माच्या या प्रश्नावर सूर्याने सांगितले की, ही ट्रॉफी आली आता ती देखील ट्रॉफी लवकरच येईल. सूर्याच्या या उत्तरानंतर त्याची पत्नी देविशा शेट्टीला एकच हशा पिकला. 

टॅग्स :अक्षर पटेलसूर्यकुमार अशोक यादवऑफ द फिल्ड