‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका करणाऱ्या सुशांत सिंग राजपूतनं रविवारी राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या जाण्यानं सर्वांना मोठा धक्का बसला. काय पो छे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री मारणाऱ्या सुशांतने अनेक हिट चित्रपट दिले. धोनीच्या चित्रपटातील भूमिकेचे भरपूर कौतुक झाले. पण, वयाच्या 34व्या वर्षी त्यानं जग सोडल्याच्या बातमीनं सर्वांनाच मोठा धक्का दिला. त्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचाही समावेश आहे. धोनीचे मॅनेजर अरूण पांडे यांनी एबीपी आनंद वाहिनीशी टेलिफोनवरून बोलताना ही माहिती दिली.
‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात धोनीची भूमिका करण्यासाठी सुशांतने प्रचंड मेहनत घेतली होती. धोनीची स्टाईल जाणून घेण्यासाठी तो काही काळ त्याच्यासोबतही राहिला होता. सुशांतच्या जाण्यानं धोनीच्या डोळ्यासमोर त्या सर्व आठवणी नक्की उभ्या राहिल्या असतील. धोनी किंवा त्याची पत्नी साक्षी यांनी अजूनही सोशल मीडियावर सुशांतच्या जाण्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, त्याच्या जाण्यानं धोनीला खूपच धक्का बसल्याचे, त्याचा मॅनेजर अरुण पांडे यांनी सांगितले.
ते म्हणाले,''सुशांतच्या मृत्यूच्या बातमीवर अजूनही विश्वास बसत नाही. सुशांत केवळ 34 वर्षांचा होता आणि त्याच्या जाण्याचा शोक कसा व्यक्त करावा हेच कळत नाही. त्याचं भविष्य उज्ज्व आहे, याची मला खात्री होती. त्याच्या आत्महत्येचे वृत्त ऐकून धोनी खूपच खिन्न झाला. त्याला खूपच धक्का बसला आहे'', असे पांडे यांनी सांगितले. शूटिंगदरम्यान सुशांत धोनीसोबतही तो 15 दिवस राहिला होता.
सुशांतनं आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच क्रीडाविश्वामध्येही दु:खाची लाट पसरली. कोणत्याही खेळाडूला सुशांतच्या अशा अचानक जाण्याच्या वृत्तावर विश्वास बसत नाहीए. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्यासह क्रीडा विश्वातील अनेक दिग्गजांनी सुशांत सिंग राजपूतला श्रद्धांजली वाहिली. WWE सुपरस्टार जॉन सीनानंही त्याला श्रद्धांजली वाहिली.
भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहलीने ट्विट केले की, ‘सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्तेचे वृत्त कळताच धक्का बसला. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो. त्याचा परिवार आणि मित्रांना या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी शक्ती मिळो.’ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले की, ‘सुशांत सिंग राजपूतच्या जाण्याने मी स्तब्ध आणि दु:खी आहे. तो खूप युवा व अत्यंत गुणवान अभिनेता होता. त्याच्या परिवार, मित्रांच्या दु:खात मी सहभागी आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.
OMG: २३ कोटींच्या गाड्या अन् २८ कोटींची सुपर बोट; या खेळाडूचा थाट पाहून व्हाल अवाक्!
WWE सुपरस्टार जॉन सीनानं सुशांत सिंग राजपूतला वाहिली श्रद्धांजली
झिंगाट डान्स पाहून हरभजन सिंग झाला लोटपोट; 20 सेकंदाच्या Videoचा लय भारी शेवट पाहाच!