भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिका करणाऱ्या सुशांत सिंग राजपूतनं रविवारी आत्महत्या केली. त्याचे असे अचानक जाणे बॉलिवूडसह सर्वांनाच धक्का देणारे ठरले. कॅप्टन कूल धोनीलाही सुशांतच्या जाण्याचा मोठा धक्का बसल्याची माहिती त्याचा मॅनेजर अरुण पांडे यांनी दिली. 'एमएस धोनी:दी अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातील भूमिकेनंतर सुशांतला माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये काम करायचे होते, अशी माहिती समोर येत आहे. बायोपिक संदर्भात गांगुली आणि सुशांत यांच्यात चर्चाही झाल्याचे वृत्त News18नं प्रसिद्ध केलं आहे.
News 18ने एक्स्ट्रा टाईम्सचा हवाला दिला आहे. त्यांच्या माहितीनुसार सुशांत आणि गांगुली यांच्यात 2018मध्ये कोलकाता येथे भेट झाली होती. त्यावेळी गांगुली नॉर्थ कोलकाता हाऊस येथे एका जाहिरातीचे चित्रिकरण करत होता. तेथे सुशांत येणार आहे, हे गांगुलीला माहीत होतं. त्यामुळे गांगुलीनं त्याला नॉर्थ कोलकाताच्या लाहा रेसिडेंस येथे येण्यास सांगितले. तेथे या दोघांमध्ये बायोपिक संदर्भात जवळपास एक तास चर्चा झाली. या मिटींगमधील एक फोटो सुशांतनं सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानं लिहिलं होतं की,''माझा आनंद मी लपवू शकत नाही आणि त्यामुळेच दादासोबत फोटो काढताना असे एक्स्प्रेशन होते. त्यासाठी मला माफ करा. गांगुली शानदार व्यक्ती आहे.''धोनीच्या बायोपिकच्या यशानंतर सुशांतच्या अभिनयाचे कौतुक झाले. गांगुलीनेही त्याचे कौतुक केले होते. मला डावखुरी फलंदाजी येते, असे सुशांतनं गांगुलीला सांगितले होते आणि त्यानं काही व्हिडीओही दाखवले होते. बायोपिकची चर्चा पुढे सरकली नाही आणि ही गोष्ट दोघांमध्येच राहिली.
Video : चोरट्यांच्या मनाला पाझर फुटला; डिलिव्हरी बॉयला लुटायला गेले, पण...
सुशांतसिंह राजपूतच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरलेल्या एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती. रियल लाईफमधला धोनी रील लाईफमध्ये पडद्यावर साकारणे तितकेसे सोपे नव्हते. त्यासाठी सुशांतने फिटनेसवर मेहनत घेतली होती. धोनीचे हावभाव, त्याच्या फलंदाजीची स्टाईल आत्मसात केली होती. इतकेच नव्हे तर धोनीप्रमाणे हेलिकॉप्टर शॉट खेळण्यामध्येही त्याने हातखंडा मिळवला होता, हे सर्व शिकण्यासाठी त्याने क्रिकेटचे सुमारे वर्षभर प्रशिक्षण घेतले होते. त्याला क्रिकेटचे धडे शिकवणारे माजी क्रिकेटपटू होते भारताचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
विराट कोहली, रोहित शर्मासह क्रीडा विश्वानं शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली
54 लाख लोकांनी पाहिलंय 'या' पठ्ठ्याचं सेलिब्रेशन; असं आहे तरी काय Viral Videoत?
बाबो; अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूचे 'एलियन'नं केलेलं अपहरण; खेळाडूचा धक्कादायक दावा
CSKच्या डॉक्टरचं वादग्रस्त ट्विट; फ्रँचायझीकडून त्वरित निलंबनाची कारवाई