आधी टीम इंडियातून आउट; आता धावांची 'बरसात' करुनही पुजाराला या संघानंही दिला 'नारळ'

टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी धडपडणाऱ्या पुजाराला मोठा धक्का बसला आहे. २०२५ च्या हंगामातील काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेतून त्याचा पत्ता कट ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 04:07 PM2024-08-22T16:07:09+5:302024-08-22T16:21:30+5:30

whatsapp join usJoin us
Sussex relieves Cheteshwar Pujara for 2025 season | आधी टीम इंडियातून आउट; आता धावांची 'बरसात' करुनही पुजाराला या संघानंही दिला 'नारळ'

आधी टीम इंडियातून आउट; आता धावांची 'बरसात' करुनही पुजाराला या संघानंही दिला 'नारळ'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी धडपडणाऱ्या पुजाराला मोठा धक्का बसला आहे. २०२५ च्या हंगामातील काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेतून त्याचा पत्ता कट झाला आहे. ससेक्स संघाने कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजाराला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियातून आउट झाल्यानंतर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ज्या संघाकडून पुजारा धावांची 'बरसात' करताना दिसला त्या संघाला आता त्याच्यावर भरवसा उरलेला नाही. त्यामुळेच त्यांनी भारतीय क्रिकेटरला नारळ देत बाहेरचा रस्ता दाखवल्याचे दिसते.   

पुजारानं १० शतकासह ठोकल्या २२४४ धावा, तरीही क्लबनं नाही दाखवला भरवसा

कसोटीपटूसह अनेकांना काउंटी क्रिकेट क्लब संघाचा हा निर्णय समजण्यापलिकडचा आहे. कारण पुजारानं या स्पर्धेत धावांची अक्षरश: बरसात केल्याचे पाहायला मिळाले आहे.  पुजाराने ३ हंगामात फक्त २२ सामने खेळताना १० शतकासह एकूण २२४४ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ५० च्या खाली कधीच आली नाही. तरीही अगदी एका ओळीत त्यांनी पुजारासोबतचा करार संपुष्टात आणण्याची घोषणा केली. 

ऑस्ट्रेलियन खेळाडूसाठी पुजारा झाला बळीचा बकरा 

इंग्लंडच्या क्लबनं पुजाराला बाहेरचा रस्ता दाखवत ऑस्ट्रेलियन डेनियल ह्यूजवर भरवसा दाखवला आहे. त्याच्यासोबतचा करार कायम ठेवण्यासाठी त्यांनी पुजाराला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. हा ऑस्ट्रेलियन फलंदाज आगामी चॅम्पियनशिप आणि टी २० विटॅलिटी ब्लास्टच्या सर्व सामन्यांसाठी उपलब्ध असणार आहे. वेस्ट इंडिजचा गोलंदाज जेडन सील्स हा काउंटी टीमसोबत चॅम्पियनशिपच्या सुरुवातीच्या सामन्यात खेळणार असल्याचेही क्लबने म्हटले आहे.

टीम इंडियात परतीचा मार्ग झाला आणखी अवघड

२०२४ च्या हंगामात पुजारा सलग तिसऱ्या वेळी ससेक्सकडून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते.यंदाच्या हंगामात पुजारानं ६ सामन्यात २ शतकासह ५०१ धावा केल्या होत्या. ससेक्स क्लब संघाचे मुख्य कोच पॉल फारब्रेस यांनी पुजारासोबतचा करार संपुष्टात आणणे सोपे नव्हते, असे म्हटले आहे. पण डेनियल संघात एकदम फिट बसतो. त्यामुळेच  हा निर्णय घेण्यात आला, असेही ते म्हणाले. दुलीप करंडक स्पर्धेसाठीही पुजारा कोणत्याच संघात नाही. त्यामुळे त्याच्यासाठी टीम इंडियातील परतीचा मार्ग खडतर झाल्याचे दिसून येत आहे.  

Web Title: Sussex relieves Cheteshwar Pujara for 2025 season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.