Join us

ईडन गार्डनवरच्या त्या सामन्यात स्वामी विवेकानंदांनी उडवली होती इंग्लिश संघाची दाणादाण

देशातील थोर व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेल्या स्वामी विवेकानंद यांना महान तत्त्वज्ञ, हिंदू धर्मोपदेशक आणि तत्त्वचिंतक म्हणून जगभरात ओळखले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 15:07 IST

Open in App

कोलकाता -  देशातील थोर व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेल्या स्वामी विवेकानंद यांना महान तत्त्वज्ञ, हिंदू धर्मउपदेशक आणि तत्त्वचिंतक म्हणून जगभरात ओळखले जाते. त्यांनी मानवतेला दिलेल्या अमूल्य योगदानाची आठवण अजूनही काढली जाते. मात्र वैचारिक विश्वासोबतच खेळाच्या मैदानामध्येही स्वामी विवेकानंद यांना रस होता. ते क्रिकेट, फुटबॉल, बॉक्सिंग  आणि तलवारबाजीसारखे खेळ खेळत असत. दरम्यान, सुमारे 136 वर्षांपूर्वी कोलकात्यातील ऐतिकासिक ईडन गार्डनवर झालेल्या एका सामन्यात स्वामी विवेकानंद यांनी भेदक गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी इंग्लिश संघाची दाणादाण उडवली होती. या लढतीत स्वामी विवेकानंद यांनी तब्बल 7 बळी टिपले होते.1792 मध्ये इंग्रजांनी कलकत्ता क्लबची स्थापना केली होती. त्यानंतर कोलकात्यातील दुसऱ्या क्लबची स्थापना 1884 मध्ये झाली होती. या क्लबची स्थापना तत्कालिन प्रसिद्ध गणिततज्ज्ञ सरदरंजन यांनी केली होती. इंग्रजांना खेळाच्या मैदानातही कडवे आव्हान उभे करावे हा उद्देश समोर ठेवून या क्लबची स्थापना करण्यात आली होती. 

दरम्यान, एका औपचारिक चर्चेदरम्यान, स्वातंत्र्यसैनिक हेमचंद्र घोष यांनी स्वामी विवेकानंद यांच्याकडे क्रिकेट खेळण्याबाबत विचारणा केली होती. हेमचंद्र घोष यांचा प्रस्ताव स्वामी विवेकानंद यांनी हसत हसत स्वीकारला. त्यानंतर घोष यांनी स्वामी विवेकानंद यांना क्रिकेटमधील प्राथमिक गोष्टी समजावून सांगितल्या. 

जनतेला विवेकानंदांचे विचार आत्मसात करायला शिकवण्याची गरज

शिकागोत १५० वर्षानंतर पुन्हा ‘त्या’ भाषणाची गर्जना

विश्व व्यापून राहिलेले स्वामी विवेकानंदप्रत्यक्षात सामन्याला सुरुवात झाल्यावर स्वामी विवेकानंद यांनी भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. त्यांनी एकापाठोपाठ एक इंग्लिश फलंदाजाला माघारी धाडत एकूण सात बळी टिपले. तेव्हा इंग्लिश संघाच्या धावफलकावर केवळ 20 धावा लागल्या होत्या.   

टॅग्स :स्वामी विवेकानंदभारतहिंदुइझम