Join us  

संघ बदलताच खेळ उंचावला! Arjun Tendulkar ने गोवाकडून ऐतिहासिक कामगिरीचा पराक्रम केला

महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन ( Arjun Tendulkar) याने मुंबईसोडून गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला अन् त्याचे नशीब फळफळले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 6:48 PM

Open in App

महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन ( Arjun Tendulkar) याने मुंबईसोडून गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला अन् त्याचे नशीब फळफळले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-२० स्पर्धेत अर्जुन गोवा संघाकडून खेळतोय आणि काल मणिपूरविरुद्ध त्याने २ विकेट्स घेतल्या होत्या. पण, आज त्याने गोवा संघाकडून एकाही गोलंदाजाला आतापर्यंत न जमलेली कामगिरी करून दाखवली. हैदराबाद संघासारख्या तगड्या प्रतिस्पर्धींविरुद्ध अर्जुनची ही कामगिरी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

प्रथम फलंदाजीला आलेल्या हैदराबादने ६ बाद १७७ धावा केल्या आहेत. कर्णधार तन्मय अगरवालने ४१ चेंडूंत ५५ धावा केल्या, तर तिलक वर्माने सातत्यपूर्ण कामगिरी करताना ४६ चेंडूंत ६२ धावा केल्या. स्फोटक फलंदाज तिलकसह हैदराबादच्या चार फलंदाजांना अर्जुनने आज तंबूची वाट दाखवली. त्याने ४ षटकांत १० धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. गोवा संघाकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये तीन पेक्षा कमी सरासरीने धावा देताना ३ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा अर्जुन हा पहिलाच गोलंदाज ठरला. 

अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या मागील दोन पर्वात मुंबई इंडियन्सचा सदस्य आहे, परंतु त्याला पदार्पणाची संधी मिळालेली नाही. आयपीएल २०२२ साठी पार पडलेल्या लिलावात मुंबईने त्याच्यासाठी ३० लाख रुपये मोजले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :अर्जुन तेंडुलकरगोवाहैदराबाद
Open in App