Join us  

SYED MUSHTAQ ALI TROPHY : युवराज सिंगने वाजवले मुंबईचे बारा! पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणेसह घेतल्या ४ विकेट्स; ५२ धावांत ८ फलंदाज माघारी

SYED MUSHTAQ ALI TROPHY - सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२२ स्पर्धेच्या एलिट ए गटात सलग पाच विजय मिळवणाऱ्या मुंबईची आज रेल्वेने हालत खराब केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 12:45 PM

Open in App

SYED MUSHTAQ ALI TROPHY - सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२२ स्पर्धेच्या एलिट ए गटात सलग पाच विजय मिळवणाऱ्या मुंबईची आज रेल्वेने हालत खराब केली. या स्पर्धेत आतापर्यंत मुंबईच्या पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याने ६ सामन्यांत सर्वाधिक २७९ धावा केल्या आहेत. आजही त्याने रेल्वेविरुद्ध चांगली सुरुवात केली, परंतु युवराज सिंग ( Yuvraj Singh) समोर मुंबईच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. युवराजने मुंबईचे सलामीवीर पृथ्वी ( १०) व कर्णधार अजिंक्य रहाणे ( १२) यांचा त्रिफळा उडवला. 

उत्तर प्रदेशचा २२ वर्षीय मध्यमगती गोलंदाज युवराजने तिसऱ्या षटकात मुंबईला धक्के दिले. तिसऱ्या चेंडूवर पृथ्वीचा आणि पाचव्या चेंडूवर अजिंक्यचा त्रिफळा त्याने उडवला. त्यानंतर आलेल्या यशस्वी जैस्वाल ( ७) यालाही बाद करून युवराजने मुंबईचे कंबरडे मोडले. कर्न शर्माने  फिरकीने कमाल करताना मुंबईला आणखी अडचणीत आणले. श्रेयस अय्यर (८), शाम्स मुलानी ( ०), सर्फराज खान ( २), अमन खान ( २), हार्दिक तामोरे ( ५) हेही एकेरी धाव करून माघारी परतल्याने मुंबईची अवस्था ८ बाद ५२ अशी झाली होती. प्रदीप पूजारने ४-०-२३-२ अशी गोलंदाजी केली.

शिवम दुबे व तनुष कोटियान यांनी ८ बाद ५२ वरून मुंबईचा डाव ९ बाद ९२ धावांपर्यंत नेला. तुनष २८ धावांवर युवराजच्या गोलंदाजीवर LBW झाला. युवराजने ४-०-२०-४ अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली, कर्ण शर्मानेही १० धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. मुंबईचा संघ  १०७ धावांवर तंबूत परतला. शिवम दुबे २९ धावांवर नाबाद राहिला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :पृथ्वी शॉअजिंक्य रहाणेट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२
Open in App