ठळक मुद्देखेळाडू अधिक आक्रमकपणे खेळतील आणि चौकार आणि षटकारांची बरसात पाहायला मिळेल," असे गिब्सने सांगितले.
दुबई : काही दिवसांमध्ये टी टेन लीगला सुरुवात होणार असून आतापासून या स्पर्धेचा ज्वर सुरु झाला आहे. या लीगमध्ये क्रिकेट विश्वातील नामवंत खेळाडू खेळणार आहेत. त्यामुळे ही लीग चाहत्यांसाठी मेजवानी ठरेल, असे दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि राजपूत संघाचा प्रशिक्षक हर्षेल गिब्सने सांगितले.
"चाहत्यांना चौकार आणि षटकार पाहायला भरपूर आवडतात. ट्वेन्टी-20 लीगमध्ये 20 षटकांचा सामना असतो. पण या लीगमध्ये दहा षटकांचे सामने असतील. त्यामुळे खेळाडू अधिक आक्रमकपणे खेळतील आणि चौकार आणि षटकारांची बरसात पाहायला मिळेल," असे गिब्सने सांगितले.