टी-२० क्रिकेट : भारताची श्रीलंकेविरुद्ध आज लढत , विजयी मोहीम कायम राखण्यास उत्सुक

श्रीलंका दौ-यात कसोटी व वन-डे मालिकेतील सर्व सामने जिंकणारा भारतीय संघ आता अखेर टी-२० सामना जिंकून यजमान संघाचा पूर्णपणे ‘क्लीन स्वीप’ करीत मायदेशी परतण्यास उत्सुक आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 12:44 AM2017-09-06T00:44:58+5:302017-09-06T11:51:33+5:30

whatsapp join usJoin us
T-20 Cricket: India are keen to maintain a winning campaign against today's match against Sri Lanka | टी-२० क्रिकेट : भारताची श्रीलंकेविरुद्ध आज लढत , विजयी मोहीम कायम राखण्यास उत्सुक

टी-२० क्रिकेट : भारताची श्रीलंकेविरुद्ध आज लढत , विजयी मोहीम कायम राखण्यास उत्सुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलंबो : श्रीलंका दौ-यात कसोटी व वन-डे मालिकेतील सर्व सामने जिंकणारा भारतीय संघ आता अखेर टी-२० सामना जिंकून यजमान संघाचा पूर्णपणे ‘क्लीन स्वीप’ करीत मायदेशी परतण्यास उत्सुक आहे.
सध्याचा फॉर्म लक्षात घेता भारताला विजय मिळवणे कठीण जाणार नसल्याचे भासत आहे. भारताने कसोटी मालिकेत ३-० ने आणि वन-डे मालिकेत ५-० ने विजय मिळवला आहे.
या सामन्याच्या निमित्ताने भारताला आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात खेळल्या जाणाºया आगामी टी-२० मालिकेच्या तयारीसाठी मदत होईल. भारत यंदा मायदेशातील मोसमात एकूण ९ टी-२० सामने खेळणार आहे. सर्व मालिकांमध्ये प्रत्येकी तीन लढती होतील.
भारतीय संघ २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये होणाºया विश्वकप स्पर्धेपूर्वी प्रयोग करीत आहे. रिषभ पंतची चाचणी घेता आली असती, पण त्याचा संघात समावेश नाही. शिखर धवन गेल्या आठवड्यात आजारी आईला भेटण्यासाठी मायदेशी परतला आहे. अशा स्थितीत संघ व्यवस्थापनाकडे पंतला पाचारण करण्याची संधी होती.
पाचव्या वन-डे लढतीत डावाची सुरुवात धवनच्या स्थानी अजिंक्य रहाणेने केली होती. पंतने यापूर्वी इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध दोन टी-२० सामने खेळलेले आहेत, पण भारत ‘अ’ संघातर्फे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निराशाजनक कामगिरीनंतर त्याला दौºयातून वगळण्यात आले.
वेस्ट इंडिजविरुद्ध एकमेव टी-२० सामन्यात विराट कोहलीने धवनच्या साथीने डावाची सुरुवात केली होती आणि पंत तिसºया स्थानी उतरला होता. या दोघांच्या अनुपस्थितीत कर्णधार संघात काही बदल करावे लागणार आहेत. रोहित शर्माचे टी-२० संघात पुनरागमन होणार आहे. रोहित विंडीज दौºयावर गेला नव्हता. के.एल. राहुल आणि मनीष पांडे मधल्या फळीत खेळतील. केदार जाधवने अखेरच्या वन-डेमध्ये अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे त्याला आणखी एक संधी मिळू शकते.
हार्दिक पांड्याला पाचव्या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्याला टी-२० सामन्यात संधी मिळू शकते. तो वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा अखेरचा टी-२० सामना खेळला नव्हता. त्यावेळी कोहलीने पाच स्पेशालिस्ट गोलंदाजांना संधी दिली होती. त्याला संधी मिळाली तर गोलंदाजी संयोजन वन-डेप्रमाणे होईल. त्यात पाच स्पेशालिस्ट गोलंदाजांची निवड करण्यात येईल.
जसप्रीत बुमराहचे खेळणे निश्चित आहे, पण शार्दुल ठाकूरला पुन्हा संधी मिळते का, याबाबत उत्सुकता आहे. अखेरच्या लढतीत तो खेळला, पण महागडा ठरला होता.
कोहली टी-२० लढतीत लेग स्पिनरला संधी देण्यास उत्सुक असतो. कारण इंग्लंडविरुद्ध नागपूर व बेंगळुरूमध्ये त्याने युजवेंद्र चहल व अमित मिश्रा या दोघांनाही संधी दिली होती. यावेळी तो चहल व कुलदीप यादव यांना संधी देऊ शकतो.
दरम्यान, श्रीलंका संघाने आपल्या मूळ टी-२० संघात बदल केले आहेत. लेग स्पिनर जाफरी वांडेरसे व सीम गोलंदाज अष्टपैलू दासुन शनाका यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल दुखापतीतून सावरला आहे. फिरकीपटू अकिला धनंजयाचा संघात समावेश करण्यात आला आहे.
लेग स्पिनर लक्षण संदाकनला संघात स्थान मिळालेले नाही. वेगवान गोलंदाज विश्वा फर्नांडो आणि दुष्मंता चामीरा हे संघाबाहेर आहेत. लसिथ मलिंगा पुन्हा एकदा संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. सर्वांची नजर मात्रत उपुल थरंगावर राहील.
अँजेलो मॅथ्यूजने कर्णधारपद सोडल्यानंतर कर्णधार म्हणून त्याचा पहिलाच टी-२० सामना राहणार आहे. आयसीसी रँकिंगमध्ये भारत पाचव्या तर श्रीलंका आठव्या स्थानी आहे.(वृत्तसंस्था)
सामना (भारतीय वेळेनुसार) : रात्री ७ वाजतापासून
प्रतिस्पर्धी संघ
भारत :- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के.एल. राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, एम.एस. धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार , शार्दुल ठाकूर.
श्रीलंका :- उपुल थरंगा (कर्णधार), अँजेलो मॅथ्युज, निरोशन डिकवेला, दिलशान मुनावीरा, दासुन शनाका, मिलिंदा सिरिवर्धना, वानिंदू हसरंगा, अकिला धनंजय, जाफरी वांडेरेसे, इसुरू उडाना, सीकुगे प्रसन्ना, तिसारा परेरा, लसिथ मलिंगा, सुरंगा लकमल, विकुल संजया.

Web Title: T-20 Cricket: India are keen to maintain a winning campaign against today's match against Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.