T20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 5 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात हसन अलीने (Hasan Ali) मॅथ्यू वेडचा झेल सोडला आणि त्यानंतर वेडने सलग तीन चेंडूत षटकार ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. यानंतर हसन अली आणि त्याच्या पत्नीला पाकिस्तानमध्ये प्रचंड ट्रोल केले जाऊ लागले आहे.
हसन अलीचा माफीनामा -आता हसन अलीने आपल्या चुकीबद्दल पाकिस्तानातील क्रिकेटप्रेमींची माफी मागितली आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिले, 'मला माहित आहे की तुम्ही लोक माझ्यावर खूप नाराज आहात, कारण मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. परंतु माझ्यापेक्षा जास्त दुःखी क्वचितच कुणी असेल. माझ्याकडून आपल्याला ज्या अपेक्षा आहेत, त्यासाठी नाराज होऊ नका. मला प्रत्येक स्तरावर देशाची सेवा करायची आहे. मी पुन्हा एकदा मेहनत करायला सुरुवात केली आहे. मी आणखी मजबूत होऊन तुमच्या समोर येईन. आपले सुंदर मेसेज आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. मला याची खूप आवश्यकता होती.'
भारतीय आहे हसनची पत्नी -हसनची पत्नी भारतातील आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर, ट्रोलर्सनी हसनच्या शिया असण्यावर आणि त्याची पत्नी सामिया भारतातील असल्याबद्दल सोशल मीडियावर अपशब्द लिहिले होते. एवढेच नाही, तर काहींनी तर हसनला पाकिस्तानाताल 'गद्दार'ही म्हटले होते. काहींनी तर ट्विट करून हसनला येताच गोळ्या घाला, असे म्हटले होते.
सामिया ही हरियाणातील नूह जिल्ह्यातील चंदेनी गावची रहिवासी आहे. ती एमिरेट्स एअरलाइन्समध्ये फ्लाइट इंजिनिअर आहे. त्यांचे कुटुंब फरिदाबाद येथे गेल्या १५ वर्षांपासून राहते.