T- 20 विश्वचषक सुरू आहे. भारताने या स्पर्धेत जोरदार खेळी केली. टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव जोरदार फॉर्ममध्ये आहे. सूर्यकुमार विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. हा विश्वचषक भारताने जिंकावा यासाठी सूर्यकुमार यादवच्या आईने नवस केले आहे.
सूर्यकुमार यादवचे उत्तरप्रदेश येथील गाझीपूर येथील हथौडा हे गाव. सध्या त्याच्या घरी धर्मिक पूजा सुरू आहे. त्याच्या घरच्यांनी देवाजवळ टीम इंडिया विश्वचषक जिंकण्यासाठी प्रार्थना केली आहे. (T-20 World Cup 2022)
सूर्यकुमारची आई स्वप्ना देवी यांनी सात वर्षांपूर्वीही सूर्यकुमारसाठी नवस केले होते.आता सूर्यकुमारची भारतीय क्रिकेट संघाच्या एकदिवसीय आणि टी-20 संघात निवड झाली. या वर्षीही त्यांनी भारतीय टीम विश्वचषक जिंकुदे अस नवस केले आहे.
Suryakumar Yadav चा महिन्याला ८० हजार रुपयांपासून सुरू झाला प्रवास, आता करतोय छप्परफाड कमाई
सूर्यकुमार यादवची फटकेबाजी सध्याच्या घडीला प्रत्येक गोलंदाजाच्या अंगलट येत आहे. सूर्यकुमार यादवने या स्पर्धेत 75 च्या सरासरीने 225 धावा केल्या आहेत. त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट 190 पेक्षा जास्त आहे. आज सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीला सलाम केला जात आहे, पण, त्याने खूप त्रास सहन करून आणि मेहनत करून हा मान मिळवला आहे.
झिम्बाब्वेविरोधात तुफान खेळीग्रुप स्टेजमधील अखेरच्या झिम्बाब्वेविरोधातील सामन्यात सूर्यकुमारनं 25 चेंडूंमध्ये 61 धावा केल्या होत्या. यामध्ये त्यानं तुफान फटकेबाजी केली होती. त्याच्या फटकेबाजीसमोर गोलंदाजांनीही लोटांगण घातल्याचं दिसून आलं होतं.