सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे (सोशल डिस्टन्सिंग, सामाजिक दुरावा), घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असे कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात २१ दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. तरीही लोकं रस्त्यावर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. वारंवार विनंती करूनही लोकं ऐकत नसल्यानं भारताचा गोलंदाज रस्त्यावर उतरला आहे आणि तो लॉकडाऊन मोडणाऱ्यांना चोपही देत आहे.
Video : सचिन तेंडुलकरचा मास्टर स्ट्रोक; कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी केला दृढ निश्चय
आतापर्यंत जगभरात 4, 22,829 कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि त्यापैकी 18, 907 जणांचा मृत्यू झाला आहे. पण, एक लाखाहून अधिक लोकंही बरी झाली आहेत. भारतातील आकडा 562 झाला असून त्यापैकी 11 जणं दगावली आहेत. वारंवार सूचना करूनही लोकं सोशल डिस्टन्स राखत नसल्यानं मंगळवारी पंतप्रधान मोदींना देशभरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तरीही लोकं घराबाहेर पडत आहेत. भारताला 2007 चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकून देणारा गोलंदाज जोगींदर शर्मा रस्त्यावर उतरला आहे.
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात जोगींदरच्या अखेरच्या षटकानं भारताला जेतेपद पटकावून दिले होते. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर जोगींदरनं हरयाणा पोलीस जॉईन केले आणि तेथे तो पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत आहे. त्यामुळेच तो रस्त्यावर उतरून लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लिओनेल मेस्सी अन् ख्रिस्तियानो रोनाल्डो यांंचा मदतीचा हात; सार्वजनिक हॉस्पिटलला कोट्यवधींची मदत
सानिया मिर्झाची समाजोपयोगी चळवळ; रोजंदारी कामगारांचे पोट भरण्याचा निर्धार
संपूर्ण देश लॉकडाऊन; आर अश्विननं जनतेला करून दिली 'त्या' प्रसंगाची आठवण
Video : शिखर धवन बनला धोबी... सायना नेहवालसह डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबीकडून सांत्वन
पंतप्रधान मोदींच्या 'त्या' घोषणेनं IPL 2020च्या आशा मावळल्या? BCCIचं महत्त्वपूर्ण विधान
वा दादा... सरकारसाठी खुलं करणार इडन गार्डन मैदान; क्वारंटाईन लोकांच्या मदतीसाठी पुढाकार
हरभजन सिंगनं केलं शाहिद आफ्रिदीचं कौतुक; कारण जाणून तुम्हीही ठोकाल कडक सॅल्यूट
याला म्हणतात देशसेवा... बांगलादेशच्या 27 क्रिकेटपटूंनी कोरोनाशी लढण्यासाठी दिला त्यांचा पगार
Web Title: T 20 World Cup Winner Joginder Sharma Joins The Fight Against Coronavirus svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.