टी२० विश्वचषक, ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीत धडक; न्यूझीलंडवर ४ धावांनी मात

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने महिला टी२० विश्वचषक स्पर्धेतील निर्णायक लढतीत सोमवारी येथे न्यूझीलंडचा ४ धावांनी पराभव केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 04:23 AM2020-03-03T04:23:48+5:302020-03-03T04:23:54+5:30

whatsapp join usJoin us
T-World Cup, Australia beat Semifinals; New Zealand win by 4 runs | टी२० विश्वचषक, ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीत धडक; न्यूझीलंडवर ४ धावांनी मात

टी२० विश्वचषक, ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीत धडक; न्यूझीलंडवर ४ धावांनी मात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मेलबोर्न : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने महिला टी२० विश्वचषक स्पर्धेतील निर्णायक लढतीत सोमवारी येथे न्यूझीलंडचा ४ धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरी गाठली. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत बेथ मुनेच्या (६०) जोरावर ५ बाद १५५ धावांची मजल मारुन न्यूझीलंडला ७ बाद १५१ धावांत रोखले.
अ गटातून भारतानंतर आॅसी संघाने उपांत्य फेरी गाठली े असून ‘ब’ गटातून द. आफ्रिका व इंग्लंड अंतिम चारसाठी पात्र ठरले. लेग स्पिनर जॉर्जिया वेरयहमने ४ षटकांत केवळ १७ धावा देत ३ बळी घेतले. कॅटी मार्टिनने १८ चेंडूंमध्ये चार चौकार व १ षटकारांसह ३७ धावांची खेळी करीत न्यूझीलंडच्या आशा कायम राखल्या होत्या, पण तिचे प्रयत्न अपुरेच पडले.
त्याआधी, मुनेने ५० चेंडूंमध्ये ६ चौकार व २ षटकार मारले. तिला कर्णधार मेग लेनिंग (२१), एश्लेघ गार्डेनर (२०), एलिस पेरी (२१) यांची चांगली साथ लाभली. रसेल हेन्सने ८ चेंडूंत नाबाद १९ धावा वसूल करत संघाला १५५ धावापर्यंत मजल मारून दिली.
यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. कर्णधार सोफी डिवाईनने ३१ व मॅडी ग्रीनने २८ धावा केल्या. मेगन शटने ३ बळी घेतले, पण सामनावीर वेयरहमने प्रमुख फलंदाज बाद करत सामन्याचे चित्रच पालटले. (वृत्तसंस्था)

Web Title: T-World Cup, Australia beat Semifinals; New Zealand win by 4 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.