ठळक मुद्देपखतून्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत बंगालला 93 धावांमध्ये रोखले होते.या आव्हानाचा पाठलाग करताना फ्लेचरच्या खेळीच्या जोरावर पखतून्सने विजय मिळवला. आर पी सिंगने दोन षटकांमध्ये 14 धावा देत दोन बळी मिळवले.
शारजा, टी-10 लीग : आंद्रे फ्चेचरच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर पखतून्स संघाने बंगाल टायगर्सवर सात विकेट्स आणि 15 चेंडू राखून सहज विजय मिळवला.
पखतून्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत बंगालला 93 धावांमध्ये रोखले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना फ्लेचरच्या खेळीच्या जोरावर पखतून्सने विजय मिळवला. फ्लेचरने 18 चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 47 धावा केल्या.
भारताचा माजी गोलंदाज आर पी सिंगने केलेल्या भेदक माऱ्यामुळे पखतून्स संघाला बंगाल टायगर्स संघाला 93 धावांमध्ये रोखले. आर पी सिंगने दोन षटकांमध्ये 14 धावा देत दोन बळी मिळवले.
बंगालच्या डावाची सुरुवात चांगली झाली होती. पण सलामीवीर जेसन रॉय बाद झाल्यावर मात्र बंगालचा डाव घसरत गेला. बंगालकडून शेरफेन रुदरफोर्डने 24 धावांची खेळी साकारली.
आर पी सिंगचा भेदक मारा
शारजा, टी-10 लीग : भारताचा माजी गोलंदाज आर पी सिंगने केलेल्या भेदक माऱ्यामुळे पखतून्स संघाला बंगाल टायगर्स संघाला 93 धावांमध्ये रोखले. आर पी सिंगने दोन षटकांमध्ये 14 धावा देत दोन बळी मिळवले.
बंगालच्या डावाची सुरुवात चांगली झाली होती. पण सलामीवीर जेसन रॉय बाद झाल्यावर मात्र बंगालचा डाव घसरत गेला. बंगालकडून शेरफेन रुदरफोर्डने 24 धावांची खेळी साकारली.
Web Title: T10 League: Andre Fletcher's aggressive knock
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.