शारजा, टी-10 लीग : मराठा अरेबियन्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत राजपूत संघाला 63 धावांमध्ये रोखण्याची किमया साधली. यावेळी राजपूत संघाच्या फक्त एकाच फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या उभारता आली.
मराठा अरेबियन्स संघाच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भेदक मारा केला. त्यामुळे निर्धारीत 10 षटकांमध्ये राजपूत संघाची 7 बाद 63 अशी अवस्था झाली. मराठा अरेबियन्स संघाकडून रीचर्ड ग्लीसनने फक्त 9 धावांमध्ये दोन फलंदाजांना बाद केले. त्याचबरोबर जेम्स फॉल्कनरने 13 धावांत दोन बळी मिळवले.