Join us  

T10 League: रजपूत संघाची विजयी घोडदौड पखतून्सने रोखली

T10 League: रजपूत संघाला टी-10 लीगमध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद करण्यात अपयश आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 6:55 PM

Open in App
ठळक मुद्देरजपूत संघाला टी-10 लीगमध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद करण्यास अपयश आलेपखतून्स संघाने 9 विकेट राखून मिळवला विजयअँड्रे फ्लेचरची नाबाद 68 धावांची खेळी

शारजा, टी-10 लीग : रजपूत संघाला टी-10 लीगमध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद करण्यात अपयश आले. शुक्रवारी झालेल्या सामन्यात पखतून्सने 9 विकेट राखून विजय मिळवला. ब्रेंडन मॅकलमच्या 58 धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर रजपूतने 10 षटकांत 3 बाद 121 धावा केल्या होत्या. त्याला पखतून्सच्या अँड्रे फ्लेचरने उत्तर दिले. फ्लेचरने 27 चेंडूंत नाबाद 68 धावांची खेळी केली. त्याला शफिकुल्लाहने ( 29*) चांगली साथ दिली. या दोघांनी 73 धावांची भागीदारी केली.

 ब्रेंडन मॅकलमच्या खणखणीत अर्धशतकाच्या जोरावर रजपूत संघाने टी-10 लीगमध्ये शुक्रवारी पखतून्स संघासमोर 122 धावांचे लक्ष्य ठेवले. मोहम्मद शहजाद पहिल्याच षटकात माघारी परतला. रिली रोशोव आणि कर्णधार मॅकलम यांनी रजपूतचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. रोशोवने 7 चेंडूंत 4 खणखणीत षटकार खेचून 25 धावा चोपल्या. मॅकलमने 29 चेंडूंत 3 चौकार व 6 षटकारांसह 58 धावा केल्या. लॉरी इव्हान्सने त्याला चांगली साथ दिली. इव्हान्सने 7 चेंडूंत 4 षटकाराच्या मदतीने नाबाद 27 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पखतून्सच्या कॅमेरून डेलपोर्ट आणि अँड्रे फ्लेचर यांनी पहिल्याच षटकात 20 धावा चोपल्या. त्यांची 53 धावांची भागीदारी टायमल मिल्सने संपुष्टात आणली. डेलपोर्टने 14 चेंडूत 22 धावा ( 2*4, 1*6) केल्या. पखतून्सच्या 5 षटकांत 1 बाद 56 धावा झाल्या होत्या. त्यानंतर फ्लेचर आणि शफिकुल्लाहने संघाला विजय मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. फ्लेचरने अर्धशतक झळकावत रजपूतच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले. त्याने खणखणीत षटकार खेचून पखतून्सचा विजय पक्का केला. फ्लेचरने 68 धावांच्या खेळीत 5 षटकार व 6 चौकार लगावले. शफिकुल्लाहने 3 षटकार व 1 चौकार खेचत नाबाद 29 धावा केल्या.  

टॅग्स :टी-10 लीग