Join us  

Video : खतरनाक बाऊंसर; वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल थोडक्यात बचावला

गुरुवारी झालेल्या सामन्यात मोठी दुर्घटना घडता घडता राहिली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 12:16 PM

Open in App

अबु धाबीत सुरू असलेल्या T10 लीगमध्ये अनेक विक्रमांचा पाऊस पडला. पण, गुरुवारी झालेल्या सामन्यात मोठी दुर्घटना घडता घडता राहिली... बांगला टायगर्स आणि नॉर्दर्न वॉरियर्स यांच्यातल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल अगदी थोडक्यात बचावला. जर तो बाऊंसर त्याच्या डोक्यावर आदळला असता, तर त्याची रवानगी थेट हॉस्पीटलमध्ये निश्चित होती. जाणून घेऊया नक्की काय झालं...

बांगला टायगर्स संघानं प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 102 धावा केल्या. आंद्रे फ्लेचर आणि रिली रोसोव यांनी टायगर्स संघाला दमदार सुरूवात करून दिली. या दोघांच्या 46 धावांच्या भागीदारीनंतर टायगर्सची मधली फळी ढेपाळली. फ्लेचरनं 15 चेंडूंत 22, तर रोसोवनं 21 धावा केल्या. 6 बाद 64 अशा धावसंख्येवर असताना रॉबी फ्रिलिंकनं तुफानी खेळी केली. त्यानं 12 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार खेचून नाबाद 36 धावा केल्या. रयाद एम्रीतनं 16 धावांत 2 विकेट्स घेतल्या.

वॉरियर्सच्या खेळाडूंना धावांचा पाठलाग करण्यात अपयश आले. आंद्रे रसेल वगळता अन्य फलंदाजांनी निराश केले. रसेलनं एकट्यानं खिंड लढवताना 25 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार खेचून 41 धावा चोपल्या. तरीही वॉरियर्सना 6 बाद 96 धावांपर्यंतच मजल मारता आली. पण, या सामन्यात टायगर्सचा गोलंदाज कैस अहमदनं टाकलेल्या बाऊंसरवर रसेल थोडक्यात बचावला. हा बाऊंसर पाहून रसेलनं लेगचच हॅल्मेट मागवले.

पाहा व्हिडीओ...

\

टॅग्स :टी-10 लीगवेस्ट इंडिज