मुंबई इंडियन्सचा माजी फलंदाज एव्हिन लुईस ( Evin Lewis) यानं शुक्रवारी T10 Leauge ( टी १० लीग) मध्ये स्फोटक खेळी केली. वेस्ट इंडिजच्या या फलंदाजानं दिल्ली बुल्स ( Delhi Bulls) संघाचे प्रतिनिधित्व करताना एका षटकात ३३ धावा चोपून काढल्या. मराठा अरेबियन्स ( Maratha Arabians) संघाविरुद्धच्या या सामन्यात त्यानं १६ चेंडूंत ५५ धावांची खेळी केली. त्यात ७ षटकार व २ चौकारांचा समावेश होता. म्हणजे ५५पैकी ५० धावा या त्यानं चौकार-षटकारांच्या मदतीनं अवघ्या ९ चेंडूंत चोपल्या. कांगारूचा केक का कापला नाही?; अजिंक्य रहाणेचं उत्तर ऐकून त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढला
मुंबई इंडियन्सनं IPL 2020च्या ऑक्शनपूर्वी लुईसला करारमुक्त केलं. त्यानं टी १० लीगमध्ये मराठा अरेबियन्सचा गोलंदाज मुख्तार अली याच्या एकाच षटकात पाच षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला. दिल्ली बूल्सनं अवघ्या ३० चेंडूंत ९ विकेट्स राखून सामना जिंकला. मुख्तारच्या पहिल्या दोन चेंडूंवर लुईसनं खणखणीत षटकार खेचले, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. पुढील तीन चेंडूंवर तीन षटकार खेचून त्यानं दिल्लीला पाचव्या षटकातच सामना जिंकून दिला. या षटकात लुईसनं ३३ धावा जोडल्या. Fact Check : किरॉन पोलार्डच्या गाडीचा भीषण अपघात; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूच्या निधनाची चर्चा
दिल्ली बुल्सनं मराठा अरेबियन्सचा डाव ८७ धावांवर रोखला. अरेबियन्सकडून कर्णधार मोसद्देक हुसैननं ३५ धावा केल्या. बुल्सच्या फिडेल एडवर्ड्स व अमाद बट्ट यांनी सुरेख गोलंदाजी केली. बट्टनं २ षटकांत ७ धावा देताना १ विकेट घेतली, तर एडवर्ड्सनं २ षटकांत १५ धावा देताना एक विकेट घेतली.
Web Title: T10 Legaue : Evin Lewis clobbers Muktar Ali For 33 Runs In An Over, Delhi Bulls Win Over Maratha Arabians
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.