Join us  

T10 लीगमध्ये ख्रिस गेलनं रचला इतिहास, युवराज सिंगच्या 'त्या' वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी!

अबु धाबी टी 10 लीगमध्ये ( Abu Dhabi T10) युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल ( Chris Gayle) यानं मराठा अरेबियन्स ...

By स्वदेश घाणेकर | Published: February 04, 2021 11:51 AM

Open in App

अबु धाबी टी 10 लीगमध्ये ( Abu Dhabi T10) युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल ( Chris Gayle) यानं मराठा अरेबियन्स संघाच्या गोलंदाजांना धु धु धुतले. अबु धाबी टीम संघाचे प्रतिनिधित्व करताना गेलनं २२ चेंडूंत नाबाद ८४ धावा चोपल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर अबु धाबी टीमनं ५.३ षटकांत १०० धावांचे लक्ष्य पार केले. मराठा अरेबियन्सनं१ प्रथम फलंदाजी करताना ४ विकेट्सच्या मोबदल्यात १० षटकांत ९७ धावा केल्या होत्या. भारतीय क्रिकेटपटूंची अवस्था, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का!; कंगना राणौतची जहरी टीका

टी १० लीगच्या यंदाच्या मोसमातील पहिल्या चार सामन्यांत ख्रिस गेलला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यानं अनुक्रमे ४, ५ , ९ आणि २ धावा केल्या होत्या. पण, बुधवारी झालेल्या सामन्यात ४१ वर्षीय गेल जुन्या अंदाजात दिसला. त्यानं ६ चौकार व ९ षटकार खेचले. गेलनं ७८ धावा या फक्त केवळ चौकार व षटकारांनी केल्या. ख्रिस गेलनं टी १० लीगमध्ये सर्वात जलद अर्धशतकांचा विक्रम नावावर केला. त्यानं १२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. सचिन तेंडुलकरच्या #IndiaAgainst Propaganda ट्विट नंतर बाळासाहेब ठाकरे यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

यासह त्यानं युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी केली. युवीनं २००७च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध १२ चेंडूंत ५० धावा केल्या होत्या. क्रिस गेलनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये दबदबा राखला आहे. त्यानं ४११ ट्वेंटी-20 सामन्यांत १४६.७२च्या स्ट्राईक रेटनं १३५८४ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर २२ शतकं व ८५ अर्धशतकं आहेत. ट्वेंटी-20त सर्वाधिक १००० षटकारांचा विक्रम गेलच्या नावावर आहे.   'तुला माघारी बोलावण्याचा निर्णय योग्यच होता'; सचिन तेंडुलकरच्या ट्विटनंतर राहुल द्रविड होतोय ट्रेंड!

टॅग्स :टी-10 लीगख्रिस गेलयुवराज सिंग