Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : भारतीयांनी अपील न करताच Fakhar Zaman माघारी परतला, पाकिस्तानचे चाहते गोंधळले, Video 

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : भारतीय गोलंदाजांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये वर्चस्व गाजवले पाहायला मिळतेय.  पाकिस्तानने पहिल्या १० षटकांत २ बाद ६८  धावा केल्या आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 08:34 PM2022-08-28T20:34:11+5:302022-08-28T20:36:00+5:30

whatsapp join usJoin us
T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : "Aawaz hi nahi aaya yaar"; Avesh Khan didn't even hear the nick in that loud stadium but Fakhar Zaman walks off, Pakistan 42-2 at the end of power play | Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : भारतीयांनी अपील न करताच Fakhar Zaman माघारी परतला, पाकिस्तानचे चाहते गोंधळले, Video 

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : भारतीयांनी अपील न करताच Fakhar Zaman माघारी परतला, पाकिस्तानचे चाहते गोंधळले, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Pakistan Live Match Highlight : भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् गोलंदाजांनी कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय योग्य ठरवला. भुवनेश्वर कुमार व आवेश खान यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानला दोन धक्के दिले. पाकिस्तानने पहिल्या १० षटकांत २ बाद ६८  धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा दुसरा फलंदाज भारतीय खेळाडूंनी अपील न करताच माघारी परतला... 


भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात पाकिस्तानला हादरवले. दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद रिझवानसाठी LBW ची जोरदार अपील झाली अन् मैदानावरील अम्पायरने OUT दिले. पण, चेंडू थायपॅडला लागल्याचे सांगत रिझवानने DRS घेतला अन् तिसऱ्या अम्पायरच्या पाहणीनंतर हा निर्णय बदलला गेला.  सहाव्या चेंडूवर पुन्हा रिझवानसाठी झेलबाद अपील झाली. चेंडू त्याच्या बॅटीला किनार घेत यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या हाती विसावल्याचे भारतीय संघाला वाटले. रोहितने त्यासाठी DRS घेतला. पण भारताचा हा DRS वाया गेला. Ind vs Pak 2022 Match Highlight, Ind vs Pak live Match

भुवनेश्वर कुमारने त्याच्या दुसऱ्या षटकात पाकिस्तानला मोठा धक्का दिला. कर्णधार बाबर आजम १० धावा करून अर्षदीप सिंगच्या हाती झेल देऊन माघारी परतला. भुवीने या विकेटसह एका वर्षात पहिल्या सहा षटकांत सर्वाधिक १३ विकेट्स घेण्याच्या आशिष नेहराच्या ( २०१६) विक्रमाशी बरोबरी केली. आवेश खानने सहाव्या षटकात १३ धावा दिल्या खऱ्या, परंतु सेट जोडी तोडली. त्याने फखर जमानला १० धावांवर बाद केले. आवेशने टाकलेला चेंडू चांगला उसळी घेत फखरच्या बॅटीजवळून दिनेश कार्तिकच्या हाती विसावला. कार्तिकने अपील करण्याआधीच फखरने खिलाडूवृत्ती दाखवताना माघारी जाण्याचा निर्णय घेतला. स्टेडियमवरील आवाजामुळे काहीच ऐकू येत नसल्याचे आवेश रोहितला सांगताना दिसला. आवाज ही नही आया यार! असे त्याने रोहितला सांगितले.Ind vs Pak Highlight, Ind vs Pak 2022 Match Highlight


 

Web Title: T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : "Aawaz hi nahi aaya yaar"; Avesh Khan didn't even hear the nick in that loud stadium but Fakhar Zaman walks off, Pakistan 42-2 at the end of power play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.