Ind Vs Pakistan Live Match Highlight : भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला अन् गोलंदाजांनी कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय योग्य ठरवला. भुवनेश्वर कुमार व आवेश खान यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानला दोन धक्के दिले. पाकिस्तानने पहिल्या १० षटकांत २ बाद ६८ धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा दुसरा फलंदाज भारतीय खेळाडूंनी अपील न करताच माघारी परतला...
भुवनेश्वर कुमारने त्याच्या दुसऱ्या षटकात पाकिस्तानला मोठा धक्का दिला. कर्णधार बाबर आजम १० धावा करून अर्षदीप सिंगच्या हाती झेल देऊन माघारी परतला. भुवीने या विकेटसह एका वर्षात पहिल्या सहा षटकांत सर्वाधिक १३ विकेट्स घेण्याच्या आशिष नेहराच्या ( २०१६) विक्रमाशी बरोबरी केली. आवेश खानने सहाव्या षटकात १३ धावा दिल्या खऱ्या, परंतु सेट जोडी तोडली. त्याने फखर जमानला १० धावांवर बाद केले. आवेशने टाकलेला चेंडू चांगला उसळी घेत फखरच्या बॅटीजवळून दिनेश कार्तिकच्या हाती विसावला. कार्तिकने अपील करण्याआधीच फखरने खिलाडूवृत्ती दाखवताना माघारी जाण्याचा निर्णय घेतला. स्टेडियमवरील आवाजामुळे काहीच ऐकू येत नसल्याचे आवेश रोहितला सांगताना दिसला. आवाज ही नही आया यार! असे त्याने रोहितला सांगितले.Ind vs Pak Highlight, Ind vs Pak 2022 Match Highlight