Join us  

Asia Cup 2022, IND vs PAK : 'तिरंगा व्हिडीओ'वरून जय शाह यांच्यावर विरोधकांचा निशाणा, Video

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : आशिया चषक स्पर्धेत ( Asia Cup 2022)  भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर रोमहर्षक विजयाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 12:19 PM

Open in App

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : आशिया चषक स्पर्धेत ( Asia Cup 2022)  भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर रोमहर्षक विजयाची नोंद केली. हार्दिक पांड्या, विराट कोहली, रवींद्र् जडेजा, भुवनेश्वर कुमार अगदी नव्याने दाखल झालेल्या अर्षदीप सिंग यानेही उल्लेखनीय कामगिरी करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. १४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला अखेरच्या षटकापर्यंत संघर्ष करावा लागला आणि ३ चेंडूंत ६ धावा हव्या असताना हार्दिकने विजयी षटकार खेचला. १० महिन्यांपूर्वी पाकिस्तानने येथेच ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतावर विजय मिळवला होता आणि आज त्याची सव्याज परतफेड केली गेली. भारताच्या या विजयाचे देशात सेलिब्रेशन करण्यात आले. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारताचा गजर घुमला.. पण, BCCI सचिव जय शाह ( Jay Shah) यांच्या एका कृतीने संतापाची लाट पसरली.

हार्दिकने विजयी षटकार खेचल्यानंतर स्टेडियमवर एकच जल्लोष झालेला पाहायला मिळाला. गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे आशियाई क्रिकेट संघटनेचे अध्यक्षही आहेत. तेही हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते आणि भारताच्या विजयानंतर ते पेव्हेलियनमध्ये उभे राहून टाळ्या वाजवू लागले. अशात त्यांच्या शेजारी असलेल्या व्यक्तिने त्यांना तिरंगा देऊ केला, परंतु जय शाह यांनी नकार दिला. आता विरोधकांनी हाच व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून टीकेला सुरुवात केली आहे. नेटीझन्सनीही ट्रोलिंग सुरू केले.  

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानजय शाहऑफ द फिल्ड
Open in App