Join us  

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : विजयी षटकार खेचण्यापूर्वी Hardik Pandya ने केलं असं काही, Video घालतोय धुमाकूळ

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : २०१८मध्ये दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या याच मैदानावर आशिया चषक स्पर्धेतच पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर जावे लागले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 8:15 AM

Open in App

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : २०१८मध्ये दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या याच मैदानावर आशिया चषक स्पर्धेतच पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर जावे लागले होते. याच मैदानावर ४ वर्षांनी अष्टपैलू खेळाडूने भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात विजयासाठी ७ धावा हव्या असताना सेट फलंदाज रवींद्र जडेजा बाद झाला. दिनेश कार्तिकने एक धाव घेत हार्दिकला स्ट्राईक दिली. त्यानंतर एक निर्धाव चेंडू खेळल्यानंतर ३ चेंडूंत ६ धावा भारताला हव्या होत्या. मोहम्मद नवाज तो तिसरा चेंडू टाकण्यापूर्वी हार्दिकने एक कृती केली आणि तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय. 

बाबर आजम ( १०) अपयशी ठरल्यानंतर मोहम्मद रिझवान ( ४३) व इफ्तिखार अहमद ( २८) यांनी डाव सावरला. शाहनवाज दहानीने ६ चेंडूंत १६ धावा करून पाकिस्तानला १४७ धावांपर्यंत मजल मारून दिली. भुवनेश्वर कुरमाने २६ धावांत ४ विकेट्स घेतल्या आणि पाकिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. हार्दिकने ३, अर्षदीप सिंगने २ व आवेश खानने १ विकेट घेतली. ट्वेंटी-२०त प्रथमच सर्वच्या सर्व १० विकेट्स भारतीय जलदगती गोलंदाजांनी घेण्याचा विक्रम केला. ३ विकेट्स अन् ३३ धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) भारताच्या विजयाचा नायक ठरला. 

प्रत्युत्तरात भारताला पहिल्या षटकात लोकेश राहुलच्या ( गोल्डन डक) रुपाने पहिला धक्का दिला. रोहित शर्मा ( १२) व विराट ( ३५) यांनी ४९ धावांची भागीदारी केली. रवींद्र जडेजाने चौथ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवसह ( १८) ३१ धावा जोडल्या. हार्दिक व जडेजाने २९ चेंडूंत ५२ धावा चोपून पाकिस्तानच्या हातून सामना खेचून आणला.  अखेरच्या षटकात ७ धावा हव्या असताना जडेजाचा ( ३५ ) त्रिफळा उडवला. मॅच फिनिशर दिनेश कार्तिकने एक धाव घेत हार्दिकला स्ट्राईक दिली. ३ चेंडूत ६ धावा हव्या असताना हार्दिकने षटकार खेचून विजय पक्का केला. भारताने ५ विकेट्स राखून सामना जिंकला. हार्दिकने १७ चेंडूंत नाबाद ३३ धावा केल्या. 

षटकार खेचण्यापूर्वीचा हार्दिकचा व्हिडीओ...

टॅग्स :एशिया कप 2022हार्दिक पांड्याभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App