Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : हा माझा Ego नाही, तर आत्मविश्वास आहे! पाकिस्तानची धुलाई केल्यानंतर Hardik Pandya असं का म्हणाला?

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : ३ विकेट्स अन् ३३ धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) भारताच्या विजयाचा नायक ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 07:34 AM2022-08-29T07:34:35+5:302022-08-29T07:35:01+5:30

whatsapp join usJoin us
T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight :  Hardik Pandya said, "the bowler is more under pressure bowling to me in the 20th over. It's not my ego, just the confidence I have". | Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : हा माझा Ego नाही, तर आत्मविश्वास आहे! पाकिस्तानची धुलाई केल्यानंतर Hardik Pandya असं का म्हणाला?

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : हा माझा Ego नाही, तर आत्मविश्वास आहे! पाकिस्तानची धुलाई केल्यानंतर Hardik Pandya असं का म्हणाला?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : ३ विकेट्स अन् ३३ धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) भारताच्या विजयाचा नायक ठरला. मागच्या वर्षी याच मैदानावर भारताला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता आणि तेव्हा हार्दिकवरही टीका झाली होती. आज त्याने आपल्या खेळीने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वाहवाह मिळवली. विराट कोहली ( Virat Kohli) ला शून्यावर जीवदान मिळाले आणि त्याने चांगले फटके मारून आश्वासक खेळी केली. रवींद्र जडेजाचे ( Ravindra Jadeja) प्रमोशन फलदायी ठरले. त्याने हार्दिकसह महत्त्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करून भारताला ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. 


भुवी व आवेश खान यांनी सुरुवातीला धक्के दिल्यानंतर हार्दिकने ३ विकेट्स घेत पाकिस्तानची मधली फळी विस्कळीत करून टाकली. अर्षदीप सिंग व आवेश खान यांनीही धक्के दिले. भुवनेश्वर कुरमाने २६ धावांत ४ विकेट्स घेतली आणि पाकिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. बाबर आजम ( १०) अपयशी ठरल्यानंतर मोहम्मद रिझवान ( ४३) व इफ्तिखार अहमद ( २८) यांनी डाव सावरला. शाहनवाज दहानीने ६ चेंडूंत १६ धावा करून पाकिस्तानला १४७ धावांपर्यंत मजल मारून दिली.  Ind vs Pak Highlight, Ind vs Pak 2022 Match Highlight

प्रत्युत्तरात भारताला पहिल्या षटकात लोकेश राहुलच्या ( गोल्डन डक) रुपाने पहिला धक्का दिला. नसीम शाहच्या त्या षटकात विराटचा झेल सुटला. रोहित शर्मा ( १२) व विराट ( ३५) यांनी ४९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर बढती मिळालेल्या जडेजाने चौथ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवसह ( १८) ३१ धावा जोडल्या. हार्दिक व जडेजाने २९ चेंडूंत ५२ धावा चोपून पाकिस्तानच्या हातून सामना खेचून आणला.  अखेरच्या षटकात भारताला आता ७ धावा हव्या असताना जडेजाचा ( ३५ ) त्रिफळा उडवला. मॅच फिनिशर दिनेश कार्तिक मैदानावर आला. त्याने एक धाव घेत हार्दिकला स्ट्राईक दिली. Ind vs Pak 2022 Match Highlight
३ चेंडूत ६ धावा हव्या असताना हार्दिकने षटकार खेचून विजय पक्का केला. भारताने ५ विकेट्स राखून सामना जिंकला. हार्दिकने १७ चेंडूंत नाबाद ३३ धावा केल्या. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिकला Player of the Match पुरस्कारानो गौरविण्यात आले.   Ind vs Pak live Match, Ind vs Pak Match Asia cup Highlights

हार्दिक पांड्या काय म्हणाला?
''योग्य परिस्थितीत आपले शस्त्र काढणे महत्त्वाचे असते.  आखूड व उसळी घेणारा चेंडू टाकणे ही माझे बलस्थान आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला प्रत्येक षटकांती रणनीती बदलावी लागते. अखेरच्या षटकात आम्हाला ७ धावांचीच गरज होती, जर १५ धावा करायच्या असत्या तरी मी केल्या असत्या. हा माझा EGO नाही तर आत्मविस्वास बोलतोय.  


अखेरच्या षटकात माझ्यापेक्षा गोलंदाज अधिक दडपणाखाली होता, असे मला वाटते. माला फक्त एक षटकार मारायचा होता आणि मी शांत डोक्याने ते केलं, असेही हार्दिक म्हणाला. 

 

Web Title: T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight :  Hardik Pandya said, "the bowler is more under pressure bowling to me in the 20th over. It's not my ego, just the confidence I have".

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.