Ind Vs Pakistan Live Match । नवी दिल्ली : आशिया चषकात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला १९.५ षटकांमध्ये १४७ धावांपर्यंत रोखले. मोहम्मद रिझवानच्या ४३ धावांच्या जोरावर पाकिस्तानने भारताला विजयासाठी १४९ धावांचे आव्हान दिले. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ४ बळी घेतले तर हार्दिक पांड्याने ३ बळी घेऊन पाकिस्तानी फलंदाजीची कंबर मोडली. तर अर्शदीप सिंग (२) आणि आवेश खानने १ बळी पटकावला. दुसऱ्या डावात पाकिस्तानने देखील चांगली टक्कर देऊन भारतावर दबाव टाकला. नसीम शाहने आपल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर के.एल राहुलचा त्रिफळा उडवून भारताला पहिला झटका दिला.
दरम्यान, पाकिस्तानी संघाचा प्रमुख गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया चषकाच्या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याची कमी भासत असल्याचे पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिकने व्हिडीओच्या माध्यमातून म्हटले आहे. "मला वाटतं की सध्या मैदानात आपण एका व्यक्तीला मिस करत आहोत", असे म्हणते शोएब मलिकने आफ्रिदी खेळत नसल्याने खंत व्यक्त केली आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग.
आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहानी.