Join us  

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : पाकिस्तानचा 'करेक्ट कार्यक्रम'; भारताचे 'हार्दिक' अभिनंदन

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामन्यात भारताचा विजय झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 11:52 PM

Open in App

Ind Vs Pakistan Live Match । नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) भारतीय संघाने विजयी सलामी दिली आहे. पाकिस्तानने दिलेल्या १४८ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करून भारतीय संघाने ही किमया साधली. पाकिस्तानने १९.५ षटकांत सर्वबाद १४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताची सुरूवात निराशाजनक झाली मात्र अखेर जडेजा आणि पांड्याच्या संयमी खेळीने भारताला विजय मिळवून दिला. हार्दिक पांड्याने विजयी षटकार लगावून भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. 

रोमहर्षक सामन्यात अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी ६ चेंडूंत ७ धावांची आवश्यकता होती. अखेरचे षटक घेऊन आलेल्या मोहम्मद नवाजने पहिल्याच चेंडूवर जडेजाचा त्रिफळा उडवला. दुसऱ्या चेंडूंवर दिनेश कार्तिकने १ धाव काढून हार्दिक पांड्याला फलंदाजी करण्याची संधी दिली. चौथा चेंडू डॉट गेला असता ३ चेंडूंत ७ धावांची आवश्यकता होती. अखेर तिसऱ्या चेंडूंवर हार्दिकने षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. 

भारताची विजयी सलामी तत्पुर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत भारतीय गोलंदाजांनी सुरूवातीपासूनच पाकिस्तानवर दबाव टाकण्यास सुरूवात केली. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानला २ गडी गमावून अवघ्या ४३ धावा करता आल्या, याचाच फायदा घेऊन भारताने सामन्यात पकड बनवण्यास सुरूवात केली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ४ बळी पटकावले तर हार्दिक पांड्याला ३ बळी घेण्यात यश आले. तसेच अर्शदीप सिंग (२) आणि आवेश खानने १ बळी पटकावला. 

भारताच्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. संघाचा सलामीवीर फलंदाज के.एल राहुल आपल्या पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला. त्याला टी-२० मध्ये पदार्पण केलेल्या नसीम शाहने बाद केले. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना खेळपट्टीवर जास्त वेळ टिकता आले नाही. किंग कोहलीने मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करून ३५ धावांची साजेशी खेळी केली. भारताकडून रविंद्र जडेजाने प्रभावशाली २९ चेंडूंत ३५ धावांची खेळी केली, तर विराट कोहली (३५), रोहित शर्मा (१२), सूर्यकुमार यादव (१८) आणि हार्दिक पांड्याने नाबाद ३३ धावांची खेळी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग. 

आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहानी.   

 

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानभारतहार्दिक पांड्यारवींद्र जडेजा
Open in App