Ind Vs Pakistan Live Match । नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) आज कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमनेसामने आहेत. भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल करण्यात आला असून रिषभ पंतला (Rishabh Pant) वगळण्यात आले आहेत. तर दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) संधी देण्यात आली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी (India Won The Toss) करण्याचा निर्णय घेतला. डावाच्या पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीने पाकिस्तानी सलामीवीरांना धक्के द्यायला सुरूवात केली. मात्र पाकिस्तानच्या एका रिव्ह्यूने आपल्या एका विकेटचा बचाव केला तर भारताला आपला रिव्ह्यू गमवावा लागला. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानच्या संघाला २ गडी गमावून ४३ धावा करता आल्या.
दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अवघ्या १० धावा करून तंबूत परतला, त्याला भुवनेश्वर कुमारने आपल्या दुसऱ्या षटकात बाद केले. भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी २-२ षटके टाकून पहिल्या ४ षटकांमध्ये २३ धांवावर १ बाद अशा धावसंख्येसह भारताची पकड मजबूत केली. भारताकडून तिसरे षटक हार्दिक पांड्याने टाकले, ज्यामध्ये पाकिस्तानला केवळ ७ धावा काढता आल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकाची गोलंदाजी आवेश खानच्या खांद्यावर सोपवण्यात आली. आवेश खानच्या षटकात रिझवानने आक्रमक रूप धारण करून १ षटकार आणि १ चौकार ठोकून दबाव झटकण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आवेश खानने जोरदार कमबॅक करत फखर जमानला बाद केले आणि भारताला दुसरा बळी मिळवून दिला. पहिल्या ६ षटकांपर्यंत मोहम्मद रिझवान (२९) धावांवर खेळत आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग.
आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहानी.