Ind Vs Pakistan Live Match Highlight : भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताना निम्मी लढाई जिंकली आहे. दुबईत आतापर्यंत ७५ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात आले आणि धावांचा पाठलाग करताना ३९ वेळा संघ जिंकला आहे. दव फॅक्टरमुळे येथे दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे जाते आणि त्यामुळे नाणेफेकीचा कौल अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय... कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) आजच्या सामन्यात रिषभ पंत खेळणार नसल्याचे जाहीर करताच सर्वांना धक्का बसला. पण, भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) तिसऱ्या षटकात पाकिस्तानी चाहत्यांची बोलती बंद केली.
Asia Cup 2022 India Vs Pakistan Live : पहिल्याच षटकात भारताला बसला धक्का, मोहम्मद रिझवानचा झाला फायदा
भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात पाकिस्तानला हादरवले. दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद रिझवानसाठी LBW ची जोरदार अपील झाली अन् मैदानावरील अम्पायरने OUT दिले. पण, चेंडू थायपॅडला लागल्याचे सांगत रिझवानने DRS घेतला अन् तिसऱ्या अम्पायरच्या पाहणीनंतर हा निर्णय बदलला गेला. सहाव्या चेंडूवर पुन्हा रिझवानसाठी झेलबाद अपील झाली. चेंडू त्याच्या बॅटीला किनार घेत यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या हाती विसावल्याचे भारतीय संघाला वाटले. रोहितने त्यासाठी DRS घेतला. पण भारताचा हा DRS वाया गेला.
भुवनेश्वर कुमारने त्याच्या दुसऱ्या षटकात पाकिस्तानला मोठा धक्का दिला. कर्णधार बाबर आजम १० धावा करून अर्षदीप सिंगच्या हाती झेल देऊन माघारी परतला. भुवीने या विकेटसह एका वर्षात पहिल्या सहा षटकांत सर्वाधिक १३ विकेट्स घेण्याच्या आशिष नेहराच्या ( २०१६) विक्रमाशी बरोबरी केली.