Ind Vs Pakistan Live Match Highlight : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने पाकिस्तानचा संघ आज भारताचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. कर्णधार बाबर आजमने काल झालेल्या पत्रकार परिषदेतून तसे संकेत दिले. शाहिन आफ्रिदीच्या माघार घेण्याचा पाकिस्तानला फटका जरी बसणार असला तरी आपल्याकडे सक्षम पर्याय असल्याचे बाबर म्हणाला होता. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात पाकिस्तानचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरणार आहेत. पाकिस्तानी मीडियाने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
Asia Cup 2022 Ind Vs Pakistan Live : वर्ल्ड कपमधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी रोहित सेना सज्ज
आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात प्रथमच लढत होतेय. यापूर्वी आशिया चषक स्पर्धेत उभय संघांमध्ये झालेल्या १४ लढतींपैकी ८ मध्ये भारताने बाजी मारली आहे, तर ५ लढती पाकिस्तानने जिंकल्या आहेत. १ लढत अनिर्णीत राहिली. सध्या पाकिस्तानमध्ये पूराने हाहाकार माजवला आहे आणि त्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाकिस्तानी खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरणार आहेत. पाकिस्तानच्या आपत्कालीन व्यवथापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत ११९ जणांचा मृत्यू झाला आहे.
३३ लाख लोक पूरामुळे बाधित...पाकिस्तानातील ११० जिल्ह्यांमध्ये पुराचा फटका बसला आहे. त्यात ९ लाख ५० हजार घरं वाहून गेली आहेत आणि ६ लाख ५० हजाराहूंन अधिक घराचं नुकसान झालं आहे.
पाकिस्तान - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.