Join us  

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : परिस्थिती काही असो, आम्ही एकदम OK!; Rohit Sharmaने सांगितला भारताच्या विजयाचा मंत्र

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : ३ विकेट्स अन् ३३ धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) भारताच्या विजयाचा नायक ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 7:55 AM

Open in App

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : ३ विकेट्स अन् ३३ धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) भारताच्या विजयाचा नायक ठरला. विराट कोहली ( Virat Kohli) ला शून्यावर जीवदान मिळाले आणि त्याने चांगले फटके मारून आश्वासक खेळी केली. रवींद्र जडेजाचे ( Ravindra Jadeja) प्रमोशन फलदायी ठरले. त्याने हार्दिकसह महत्त्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करून भारताला ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिकला Player of the Match पुरस्कारानो गौरविण्यात आले.   

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : पाकिस्तानवर ICCने केली कारवाई अन् टीम इंडियाला सापडला विजयाचा मार्ग, वाचा नेमकं काय घडलं

भुवी व आवेश खान यांनी सुरुवातीला धक्के दिल्यानंतर हार्दिकने ३ विकेट्स घेत पाकिस्तानची मधली फळी विस्कळीत करून टाकली. अर्षदीप सिंग व आवेश खान यांनीही धक्के दिले. भुवनेश्वर कुरमाने २६ धावांत ४ विकेट्स घेतली आणि पाकिस्तानविरुद्ध ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. बाबर आजम ( १०) अपयशी ठरल्यानंतर मोहम्मद रिझवान ( ४३) व इफ्तिखार अहमद ( २८) यांनी डाव सावरला. शाहनवाज दहानीने ६ चेंडूंत १६ धावा करून पाकिस्तानला १४७ धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात भारताला पहिल्या षटकात लोकेश राहुलच्या ( गोल्डन डक) रुपाने पहिला धक्का दिला. नसीम शाहच्या त्या षटकात विराटचा झेल सुटला. रोहित शर्मा ( १२) व विराट ( ३५) यांनी ४९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर बढती मिळालेल्या जडेजाने चौथ्या विकेटसाठी सूर्यकुमार यादवसह ( १८) ३१ धावा जोडल्या.

हार्दिक व जडेजाने २९ चेंडूंत ५२ धावा चोपून पाकिस्तानच्या हातून सामना खेचून आणला.  अखेरच्या षटकात ७ धावा हव्या असताना जडेजाचा ( ३५ ) त्रिफळा उडवला. मॅच फिनिशर दिनेश कार्तिकने एक धाव घेत हार्दिकला स्ट्राईक दिली. ३ चेंडूत ६ धावा हव्या असताना हार्दिकने षटकार खेचून विजय पक्का केला. भारताने ५ विकेट्स राखून सामना जिंकला. हार्दिकने १७ चेंडूंत नाबाद ३३ धावा केल्या. 

या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने टीमचे कौतुक केले. तो म्हणाला, आम्हाला विजयाचा आत्मविश्वास होता. प्रत्येक खेळाडूला त्याच्या जबाबदारीबद्दल स्पष्ट सांगितले आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला माहित्येय काय करायचे. हा सामना आव्हानात्मक होता, परंतु असा विजय मला केव्हाही मिळवायला आवडेल. आमचे गोलंदाज मागील 12 महिने उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. हार्दिक पांड्या पुनरागमनानंतर सातत्याने दमदार कामगिरी करतोय. आव्हानात्मक परिस्थितीतून जिंकू शकतो, हा विश्वास संघातील प्रत्येकात आहे.  

 

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानरोहित शर्माहार्दिक पांड्या
Open in App