Join us  

Asia Cup 2022:"हार्दिक पांड्या आंद्रे रसेलपेक्षा जास्त घातक", पाकिस्तानच्या माजी कर्णधाराकडून कौतुकाचा वर्षाव

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : हार्दिक पांड्याने विजयी षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 3:52 PM

Open in App

Ind Vs Pakistan । नवी दिल्ली : यूएईच्या धरतीवर आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमनेसामने होते. चुरशीच्या या लढतीत अखेर भारतीय संघाने विजय मिळवून टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदला घेतला. भारतीय संघाकडून हार्दिक पांड्याने नाबाद 35 धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. दोन्हीही संघांनी शानदार क्रिकेट खेळून चाहत्यांचे मनोरंजन केले मात्र हार्दिकच्या मॅच विनिंग खेळीने सर्वांनाच आकर्षित केले. त्याने अखेरच्या 3 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता असताना विजयी षटकार ठोकून प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारली. 

दरम्यान, अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने विजयी षटकार ठोकला. एका षटकाराने पांड्या सामन्याचा हिरो ठरला. भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करून पाकिस्तानच्या 19.5 षटकांमध्ये सर्वबाद 147 धावांवर रोखले होते. प्रत्युत्तरात भारताच्या डावाची सुरूवात निराशाजनक झाली. संघाचा सलामीवीर फलंदाज के.एल राहुल आपल्या पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला. त्याला टी-२० मध्ये पदार्पण केलेल्या नसीम शाहने बाद केले. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना खेळपट्टीवर जास्त वेळ टिकता आले नाही. किंग कोहलीने मोठ्या कालावधीनंतर पुनरागमन करून ३५ धावांची साजेशी खेळी केली. भारताकडून रविंद्र जडेजाने प्रभावशाली २९ चेंडूंत ३५ धावांची खेळी केली, तर विराट कोहली (३५), रोहित शर्मा (१२), सूर्यकुमार यादव (१८) आणि हार्दिक पांड्याने नाबाद ३३ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. 

हार्दिक पांड्याच्या या मॅच विनिंग खेळीनंतर पाकिस्तानच्या संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रमरने (Wasim Akram) त्याचे विशेष कौतुक केले आहे. "मला वाटते की आजच्या घडीला तो जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. त्यानुसार त्याची मानसिकता ठरलेली असते. तो 140 किमी प्रति ताशीहून अधिक वेगाने गोलंदाजी करतो आणि जेव्हा तो फलंदाजीसाठी येतो तेव्हा तो त्याची एक वेगळी छाप सोडत असतो", असे त्याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले. 

हार्दिक पांड्या आंद्रे रसेलपेक्षा जास्त घातकतसेच अक्रमने अधिक म्हटले, "मी म्हटल्याप्रमाणे, माझ्या मते तो सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. तो ज्या प्रकारे फलंदाजी करतो तो आंद्रे रसेलपेक्षाही (Andre Russel) घातक आहे, आमच्याकडे असलेल्या सर्व अष्टपैलू खेळाडूंपेक्षा तो आक्रमक आहे. तो जगातील अव्वल क्रिकेटपटूंपैकी एक आहे." अशा शब्दांत पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने हार्दिक पांड्याचे कौतुक केले. 

 

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानवसीम अक्रमहार्दिक पांड्यापाकिस्तान
Open in App