Join us  

Asia Cup 2022 Ind vs Pak: सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ चुकीचा दाखवल्यावर अक्रम भडकला; संतप्त प्रतिक्रिया व्हायरल

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 10:57 PM

Open in App

Ind Vs Pakistan Live Match । नवी दिल्ली : आशिया चषकात (Asia Cup 2022) कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) आमनेसामने आहेत. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला १९.५ षटकांमध्ये १४७ धावांपर्यंत रोखले. मोहम्मद रिझवानच्या ४३ धावांच्या जोरावर पाकिस्तानने भारताला विजयासाठी १४९ धावांचे आव्हान दिले. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ४ बळी घेतले तर हार्दिक पांड्याने ३ बळी घेऊन पाकिस्तानी फलंदाजीची कंबर मोडली. तर अर्शदीप सिंग (२) आणि आवेश खानने १ बळी पटकावला. मात्र पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम अचानक चर्चेचा विषय बनला आहे. 

दरम्यान, दुबईत रंगलेल्या या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम प्रसारकांच्या एका त्रुटीमुळे चांगलाच भडकला. या स्पर्धेसाठी प्रेझेंटेटर म्हणून काम करत असलेल्या अक्रमला प्रसारकांनी नाणेफेकीनंतर सादर केलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी यांचा समावेश तो संतापला. अक्रमने सांगितले की, मी पाकिस्तानचे फलंदाजी प्रशिक्षक मोहम्मद युसूफ यांच्याशी बोललो होतो आणि त्यांनी दहानी खेळणार असल्याचे सांगितले होते.

काही वेळानंतर संभ्रम दूर झाला आणि त्याला बरोबर इलेव्हन प्लेइंग असलेला संघ दाखवण्यात आला, ज्यामध्ये दहानीचा समावेश होता. परंतु मोठ्या सामन्यात त्रुटी असल्याची टीका करत अक्रमने आपला संताप व्यक्त केला. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग. 

आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहानी.   

 

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानवसीम अक्रमपाकिस्तान
Open in App