Join us  

Asia Cup 2022 Ind vs Pak: "आज आमचा दिवस दिसत नाही", पाकिस्तानचा खेळ पाहून शोएब अख्तर नाराज

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 9:15 PM

Open in App

Ind Vs Pakistan Live Match । नवी दिल्ली :  आशिया चषकात (Asia Cup 2022) भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यामध्ये सामना रंगला आहे. बहुचर्चित सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आक्रमक मारा करत पाकिस्तानी फलंदाजांवर दबाव राखून ठेवला. पाकिस्तानच्या फलंदाजांना पॉवरप्लेच्या ६ षटकांमध्ये केवळ ४३ धावा करता आल्या. भुवनेश्वर कुमारने आपल्या दुसऱ्याच षटकात कर्णधार बाबर आझमची शिकार केली. 

तत्पुर्वी, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत १७.१ षटकांपर्यंत ११४ धावांवर प्रतिस्पर्धी संघाचे ७ खेळाडू तंबूत पाठवले. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान (४३) वगळता कोणत्याच फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या खेळीवर त्यांच्याच संघाच्या माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने ट्विटच्या माध्यमातून सामन्याबद्दल भाष्य केले आहे.

शोएब अख्तरची नाराजी "आज आमचा दिवस दिसत नाही, कोणीही अजिबात कनेक्ट करू शकत नाही", अशा शब्दांत अख्तरने पाकिस्तानच्या खेळीवर नाराजी व्यक्त केली आहे. अर्थात पाकिस्तानच्या कोणत्याच खेळाडूला खेळपट्टीवर जम धरता येत नाही असे त्याला म्हणायचे आहे. १७.१ षटकांपर्यंत भारताकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक ३ बळी पटकावले. तर भुवनेश्वर कुमार (२), अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग. 

आजच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ -बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, खुशदिल शाह, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हरिस रौफ, शाहनवाज दहानी.   

 

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानशोएब अख्तरबाबर आजमपाकिस्तान
Open in App