T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : १४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतानाही भारतीय फलंदाजांना फार कष्ट घ्यावे लागले. पाकिस्तानचा पदार्पणवीर गोलंदाज नसीम शाहने कौतुकास्पद गोलंदाजी केली. पण, रवींद्र जडेजा व हार्दिक पांड्या या अनुभवी जोडीने डोकं शांत ठेवून भारताला विजय मिळवून दिला.
LIVE
Get Latest Updates
11:43 PM
विजयासाठी ७ धावांची गरज असताना जडेजाला ( ३५) मोहम्मद नवाजने बाद केले. जडेजा व हार्दिकची २९ चेंडूंवरील ५२ धावांची भागीदारी संपुष्टात आली. मॅच फिनिशर दिनेश कार्तिक मैदानावर आला. त्याने एक धाव घेत हार्दिकला स्ट्राईक दिली. ३ चेंडूत ६ धावा हव्या असताना हार्दिकने षटकार खेचून विजय पक्का केला. भारताने ५ विकेट्स राखून सामना जिंकला. हार्दिकने १७ चेंडूंत नाबाद ३३ धावा केल्या.
11:42 PM
हार्दिक पांड्याचा षटकार अन् भारताने काढला वचपा
हार्दिक पांड्याने १९व्या षटकात फटकेबाजी करताना पाकिस्तानच्या हातून सामना खेचून आणला. हार्दिकने ३ चौकार खेचून हॅरीस रौफच्या षटकात १४ धावा कुटल्या. अखेरच्या षटकात भारताला आता ७ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाजने २०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जडेजाचा ( ३५ त्रिफळा उडवला. मॅच फिनिशर दिनेश कार्तिक मैदानावर आला. त्याने एक धाव घेत हार्दिकला स्ट्राईक दिली. ३ चेंडूत ६ धावा हव्या असताना हार्दिकने षटकार खेचून विजय पक्का केला. भारताने ५ विकेट्स राखून सामना जिंकला. हार्दिकने १७ चेंडूंत नाबाद ३३ धावा केल्या.
11:40 PM
हार्दिक पांड्याने १९व्या षटकात फटकेबाजी करताना पाकिस्तानच्या हातून सामना खेचून आणला. हार्दिकने ३ चौकार खेचून हॅरीस रौफच्या षटकात १४ धावा कुटल्या. अखेरच्या षटकात भारताला आता ७ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाजने २०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जडेजाचा ( ३५ त्रिफळा उडवला. मॅच फिनिशर दिनेश कार्तिक मैदानावर आला.
11:32 PM
भारताला विजयासाठी १८ चेंडूंत हव्या आहेत ३२ धावा... १०.६६च्या सरासरीने कराव्या लागतील धावा. षटकांची गती संथ ठेवल्याचा फटका पाकिस्तानलाही बसला अन् त्यांना शेवटच्या ३ षटकांत केवळ ४ खेळाडूंना ३० यार्डाच्या बाहेर ठेवावी लागली. नसीम शाहच्या पायाला दुखापत झाली होती, तो लंगडताना दिसला. तरी तो गोलंदाजी करत होता. नसीमच्या त्या षटकात जडेजाने ११ धावा काढल्या. भारताला १२ चेंडूंत २१ धावा हव्या आहेत.
11:19 PM
भारताला विजयासाठी १८ चेंडूंत हव्या आहेत ३२ धावा... १०.६६च्या सरासरीने कराव्या लागतील धावा.
11:02 PM
पाकिस्तानी गोलंदाज टिच्चून मारा करताना भारतीय फलंदाजांवरील दडपण वाढवताना दिसले. भारताला अखेरच्या ६ षटकांत ५९ धावा करायच्या होत्या, तेव्हा बाबर आजमन युवा गोलंदाज नसीम शाहला पुन्हा गोलंदाजीवर आणले. त्याने जडेजा व यादवची ३६ धावांची भागीदारी तोडताना यादवचा १८ धावांवर त्रिफळा उडवला.
10:57 PM
६ षटकांत हव्या आहेत ५९ धावा
रवींद्र जडेजाला पुढे फलंदाजीला पाठवण्यात आले आणि सूर्यकुमार यादवसह त्याने खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. पण, हवा असलेला रन रेट १०च्या जवळपास पोहचलेला पाहून भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. पाकिस्तानी गोलंदाज टिच्चून मारा करताना भारतीय फलंदाजांवरील दडपण वाढवताना दिसले. भारताला अखेरच्या ६ षटकांत ५९ धावा करायच्या आहेत.
10:47 PM
१०च्या रन रेटने करायच्या आहेत धावा
रवींद्र जडेजाला पुढे फलंदाजीला पाठवण्यात आले आणि सूर्यकुमार यादवसह त्याने खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. पण, हवा असलेला रन रेट १०च्या जवळपास पोहचलेला पाहून भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता.
10:29 PM
रोहित शर्माने ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावांचा विक्रम केला पण...
विराट व रोहित शर्मा यांनी सावध खेळ करून स्वतःला सावरले. विराटची फटकेबाजी पाहता जुना विराट परत आला असेच सर्वांना वाटू लागले. या दोघांनी भारताचा डाव सावरताना ७ षटकांत भारताला १ बाद ४१ धावा करून दिल्या. पण, पुढच्याच षटकात मोहम्मद नवाजच्या गोलंदाजीवर सलग दुसरा षटकार खेचण्याच्या प्रयत्नात रोहित ( १२) धावांवर झेलबाद झाला. पण, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३४९९ धावांचा विक्रम त्याने स्वतःच्या नावावर केला. नवाजने त्याच्या पुढच्या षटकात विराटलाही बाद केले. विराट ३५ धावांवर बाद झाला.
10:20 PM
विराट व रोहित शर्मा यांनी सावध खेळ करून स्वतःला सावरले. विराटची फटकेबाजी पाहता जुना विराट परत आला असेच सर्वांना वाटू लागले. या दोघांनी भारताचा डाव सावरताना ७ षटकांत भारताला १ बाद ४१ धावा करून दिल्या.
09:46 PM
लोकेश राहुल गोल्डन डक वर परतला, विराट कोहली बाद होता होता वाचला
१९ वर्षीय गोलंदाज नसीम शाहने पदार्पणाच्या सामन्यात दमदार सुरुवात केली. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर त्याने लोकेश राहुलला Golden Duck वर बाद केले. चौथ्या चेंडूवर विराट कोहलीचा स्लीपमध्ये झेल सुटल्याने भारताला दुसरा धक्का बसता बसता राहिला.
09:30 PM
भारतासमोर विजयासाठी १४८ धावांचे लक्ष्य
हार्दिकने २५ धावांत ३ विकेट्स घेतल्या. भुवीने २६ धावांत चार धक्के दिले. पण, षटकांचा वेग संथ ठेवल्यामुळे भारताला पेनल्टी बसली आणि अखेरच्या २ षटकांत ३० यार्डाच्या आत ५ खेळाडूंना उभे करावे लागले. त्यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजांना मोठे फटके मारून धावांचा डोंगर वाढवता आला असता, परंतु भुवीने १९व्या षटकात दोन धक्के देऊन पाकिस्तानची हवा काढली. अर्षदीपने ३३ धावांत २ व आवेशने १ विकेट घेत पाकिस्तानचा डाव १४७ धावांत गुंडाळला.
09:11 PM
भुवनेश्वरला पुन्हा गोलंदाजीसाठी आणण्याचा डाव यशस्वी ठरला अन् आसीफ अली ( ९) माघारी परतला. अर्षदीप सिंगने पाकिस्तानला आणखी एक धक्का देताना मोहम्मद नवाजला बाद केले अन् पाकिस्तानची अवस्था ७ बाद ११४ अशी झाली.
08:56 PM
हार्दिक पांड्या चमकला...
इफ्तिखार अहमद व मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करताना पाकिस्तानची गाडी रुळावर आणली. त्यात युजवेंद्र चहलने अहमदला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल सोडून जीवदान दिले. हार्दिक पांड्याने वेगवान मारा करताना अप्रतिम बाऊन्सर टाकून अहमदला २८ धावांवर बाद केले. यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने अफलातून झेल घेतला. रिझवान ४३ धावा करून खेळपट्टीवर खिंड लढवत होता, परंतु त्यालाही हार्दिकने वेगवान माऱ्याने झेल देण्यास भाग पाडले. हार्दिकने १५ व्या षटकात रिझवानपाठोपाठ खुशदील शाहची ( २) विकेट घेत पाकिस्तानला धक्क्यांमागून धक्के दिले.
08:14 PM
आवेश खानला मिळाली विकेट
आवेश खानने सहाव्या षटकात १३ धावा दिल्या खऱ्या, परंतु सेट जोडी तोडली. त्याने फखर जमानला १० धावांवर बाद केले. आवेशने टाकलेला चेंडू चांगला उसळी घेत फखरच्या बॅटीजवळून दिनेश कार्तिकच्या हाती विसावला. कार्तिकने अपील करण्याआधीच फखरने खिलाडूवृत्ती दाखवताना माघारी जाण्याचा निर्णय घेतला. स्टेडियमवरील आवाजामुळे काहीच ऐकू येत नसल्याचे आवेश रोहितला सांगताना दिसला.
08:03 PM
भुवनेश्वर कुमारने त्याच्या दुसऱ्या षटकात पाकिस्तानला मोठा धक्का दिला. कर्णधार बाबर आजम १० धावा करून अर्षदीप सिंगच्या हाती झेल देऊन माघारी परतला. भुवीने या विकेटसह एका वर्षात पहिल्या सहा षटकांत सर्वाधिक १३ विकेट्स घेण्याच्या आशिष नेहराच्या ( २०१६) विक्रमाशी बरोबरी केली.
07:50 PM
बाबर आजम बाद, भारताला मोठं यश
भुवनेश्वर कुमारने त्याच्या दुसऱ्या षटकात पाकिस्तानला मोठा धक्का दिला. कर्णधार बाबर आजम १० धावा करून अर्षदीप सिंगच्या हाती झेल देऊन माघारी परतला.
07:05 PM
07:05 PM
पहिल्याच षटकात दोन DRS गमावले
भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकात पाकिस्तानला हादरवले. दुसऱ्याच चेंडूवर मोहम्मद रिझवानसाठी LBW ची जोरदार अपील झाली अन् मैदानावरील अम्पायरने OUT दिले. पण, चेंडू थायपॅडला लागल्याचे सांगत रिझवानने DRS घेतला अन् तिसऱ्या अम्पायरच्या पाहणीनंतर हा निर्णय बदलला गेला. सहाव्या चेंडूवर पुन्हा रिझवानसाठी झेलबाद अपील झाली. चेंडू त्याच्या बॅटीला किनार घेत यष्टिरक्षक दिनेश कार्तिकच्या हाती विसावल्याचे भारतीय संघाला वाटले. रोहितने त्यासाठी DRS घेतला. पण भारताचा हा DRS वाया गेला.
07:04 PM
दुबईत लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ सर्वाधिक वेळा जिंकला आहे
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रिषभ पंत आजच्या सामन्यात खेळणार नसल्याने दिनेश कार्तिक प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे. आवेश खान हा तिसरा जलदगती गोलंदाज संघात आहे.
06:53 PM
भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आर अश्विन खेळण्याची शक्यता...
06:49 PM
नाणेफेक आहे महत्त्वाची, कारण आकडेवारी ठरतेय निर्णायक
- दुबईत आतापर्यंत ७५ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात आले आणि धावांचा पाठलाग करताना ३९ वेळा संघ जिंकला आहे. दव फॅक्टरमुळे येथे दुसऱ्या डावात फलंदाजी करणे सोपे जाते आणि त्यामुळे नाणेफेकीचा कौल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दुबईत प्रथम फलंदाजी करताना १४३ या सरासरी धावा आहेत.
06:44 PM
यूएई येथे खेळलेल्या मागील 17 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तानला केवळ एकदाच पराभव पत्करावा लागला आणि त्यांनी 16 विजय मिळवले. मागील वर्षी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्यांची हार झाली होती.
06:32 PM
भारतीय खेळाडू दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाले दाखल
06:28 PM
राहुल द्रविड आले, टीम इंडियात चैतन्य पसरले
आशिया चषक स्पर्धेला रवाना होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आणि त्यामुळे त्यांना खेळाडूंसोबत दुबईत येता आले नाही. व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्याकडे प्रभारी मुख्य प्रशिक्षकपद सोपवले गेले होते. पण, काल द्रविड यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला अन् भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी ते संघाला मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचले.
06:17 PM
रोहित शर्माला खुणावतोय मोठा विक्रम
- रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३५०० धावांचा टप्पा गाठण्यासाठी आज १३ धावांची गरज आहे. हा टप्पा ओलांडणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरणार आहे. सध्या ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत न्यूझीलंडचा मार्टीन गुप्तील ३४९७ धावांसह अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रोहितच्या खात्यात ३४८७ धावा आहेत. आज १० धावा केल्यास रोहित या विक्रमात पुन्हा अव्वल स्थान पटकावेल. रोहितने १३२ सामन्यांत ४ शतकं व २७ अर्धशतकांसह या धावा केल्या आहेत.
05:44 PM
पाकिस्तानचा सामना करण्यापूर्वी विराट कोहलीने बदलला लूक...
05:44 PM
१९ वर्षीय गोलंदाजाचे पाकिस्तानकडून पदार्पण
नसीम शाह याला आज ट्वेंटी-२०त पदार्पणाची संधी मिळाली आहे. त्याने १३ कसोटींत ३३ व ३ वन डेत १० विकेट्स घेतल्या आहेत. Naseem Shah making his T20I debut today. भारताविरुद्ध ट्वेंटी-२०त पदार्पण करणारा तो चौथा पाकिस्तानी खेळाडू ठरला. यापूर्वी सोहैल तन्वीर ( २००७ वर्ल्ड कप), मोहम्मद इरफान ( २०१२) व खुर्रम मनझूर ( २०१६ आशिया चषक) यांनी भारताविरुद्ध पदार्पण केले होते.
05:36 PM
भारत-पाकिस्तान यांची प्लेइंग इलेव्हन या खेळाडूंमधून निवडणार
भारत - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंह, आवेश खान.
Asia Cup 2022 Ind vs Pak Playing XI : टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन ठरली, पाकिस्तानविरुद्ध ६-२-३ कॉम्बिनेशनचा असेल संघ
पाकिस्तान - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.
05:28 PM
अडीच तास आधीच चाहते दुबई स्टेडियमवर पोहोचले.
भारत-पाकिस्तान सामन्यातील प्रत्येक क्षण डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी चाहते अडीच तास आधीच स्टेडियमवर पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.
05:15 PM
इरफान पठाणने दिल्या दुबईहून लाईव्ह अपडेट्स
05:10 PM
आशिया चषक स्पर्धेत भारताचे पारडे जड
- आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात प्रथमच लढत होतेय. यापूर्वी आशिया चषक स्पर्धेत उभय संघांमध्ये झालेल्या १४ लढतींपैकी ८ मध्ये भारताने बाजी मारली आहे, तर ५ लढती पाकिस्तानने जिंकल्या आहेत. १ लढत अनिर्णीत राहिली. पण, वर्ल्ड कप स्पर्धेनंतर उभय संघ प्रथमच समोरासमोर येत असल्याने जास्त हवा झाली आहे.
Web Title: T20 Asia Cup 2022 india vs pakistan live Blog update Match Scorecard
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.