Join us  

Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : भारतीय चाहते ओरडू लागले चिटींग, चिटींग! अम्पायरच्या निर्णयावर भडकला रोहित शर्मा... 

T20 Asia Cup 2022 Super 4 India vs Pakistan Match Highlights :  India Vs Pakistan Super 4 Live Match Highlight : बाबर आजम पुन्हा अपयशी ठरला, तरी मोहम्मद रिझवानने फॉर्म कायम राखताना भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2022 11:13 PM

Open in App

India Vs Pakistan Super 4 Live Match Highlight : बाबर आजम पुन्हा अपयशी ठरला, तरी मोहम्मद रिझवानने फॉर्म कायम राखताना भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. मोहम्मद रिझवान व मोहम्मद नवाज या जोडीने ७३ धावांची भागीदारी करून सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकवला. भारताचा अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने मोक्याच्या क्षणी ही भागीदारी तोडली अन् सामना रंजक झाला. हार्दिक पांड्याने पुढील षटकात रिझवानची विकेट घेत सामना पूर्णपणे पलटवून टाकला. रवी बिश्नोईने टाकलेल्या १८व्या षटकात आसीफ अली ( Asif Ali) साठी जोरदार अपील झाले. रिषभ पंतने झेल टिपल्याचा दावा केला अन् रोहितने DRS घेतला. अल्ट्रा एजमध्ये बॉल व बॅटचा संपर्क झाल्याचे दिसले, परंतु तिसऱ्या अम्पायरने नाबाद दिले.  

प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून चांगली सुरूवात पाहायला मिळाली, परंतु आज संधी मिळालेल्या रवी बिश्नोईने भारताला पहिले यश मिळवून दिले. चौथ्या षटकात त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम (  १४) याला रोहितकरवी झेलबाद केले. बाबर माघारी जात असताना मैदानावरील अम्पायरने त्याला थांबवले व नो बॉल तपासायला लागला. पाकिस्तानी चाहत्यांना करिष्म्याची अपेक्षा होती, परंतु बिश्नोईने टाकलेला चेंडू वैध होता अन् पाकिस्तानला २२ धावांवर पहिला धक्का बसला. रिझवान व फाखर जमान यांनी ४१ धावांची भागीदारी करताना पाकिस्तानचा डाव सावरला होता. युजवेंद्र चहलने चतुराईने ही भागीदारी संपुष्टात आणताना फाखरला ( १५) बाद केले. पाकिस्तानला ६३ धावांवर दुसरा धक्का बसला. 

रिझवानला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्याच्या पाय मुरगळला होता आणि तो फलंदाजीला येईल की नाही याबाबत साशंकता होती. पण, तो आला अन् दमदार खेळ करत अर्धशतकही पूर्ण केले. भारतासमोर तोच एक मोठा अडथळा होता. मोहम्मद नवाजनं सामन्याचे चित्र बदलताना २००+च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली. दुसरी विकेट पडली तेव्हा पाकिस्तानला विजयासाठी ६४ चेंडूंत ११९ धावांची गरज होती. पण, रिझवान व नवाज यांनी सामन्याचे चित्र बदलले आणि ३० चेंडूंत ४७ धावा अशी मॅच फिरवली. युजवेंद्र चहलच्या चौथ्या षटकात १६ धावा चोपल्या. चहलने ४ षटकांत ४३ धावा देताना १ विकेट घेतली. 

भुवनेश्वर कुमारने १६व्या षटकात पाकिस्तानला धक्का दिला. नवाज २० चेंडूंत  ६ चौकार व २ षटकार खेचून ४२ धावांवर झेलबाद झाला. नवाज व रिझवान यांनी ४१ चेंडूंत ७३ धावांची भागीदारी केली. भुवीच्या त्या षटकात ४ धावाच आल्या. वेगाने धावा वाढवण्याच्या प्रयत्नात रिझवानही १७व्या षटकात हार्दिकच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रिझवानने ५१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ७१ धावा केल्या. आता पाकिस्तानला १९ चेंडूंत ३५ धावा करायच्या होत्या. . रवी बिश्नोईने टाकलेल्या १८व्या षटकात आसीफ अली ( Asif Ali) साठी जोरदार अपील झाले. रिषभ पंतने झेल टिपल्याचा दावा केला अन् रोहितने DRS घेतला. अल्ट्रा एजमध्ये बॉल व बॅटचा संपर्क झाल्याचे दिसले, परंतु तिसऱ्या अम्पायरने नाबाद दिले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर अर्षदीपने सोपा झेल सोडल्याने रोहित अजून भडकला.   

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App