India Vs Pakistan Super 4 Live Match Highlight : रोहित शर्मा ( Rohit Sharma) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी भारताला स्फोटक सुरुवात करून दिली. या दोघांची विकेट पडल्यानंतर विराट कोहलीने ( Virat Kohli) डाव सावरला. विराटने ३६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ट्वेंटी-२०तील हे पाकिस्तानविरुद्ध विराटचे चौथे अर्धशतक ठरले. त्याने केव्हीन पीटरसन, मार्टीन गुप्तील, केन विलियम्सन व आरोन फिंच यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. विराटचे हे ट्वेंटी-20तील 32वे अर्धशतक ठरले आणि त्याने रोहित शर्माचा 31 अर्धशतकांचा विक्रम मोडला.
रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी पहिल्याच षटकात आपला इरादा दाखवून दिला. नसीम शाहच्या पहिल्याच षटकात रोहितने खणखणीत चौकार व षटकार खेचला. या दोघांनी ४.२ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या. सहाव्या षटकात रौफच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहितने टोलावलेला चेंडू हवेत उंच गेला अन् खुशदिल शाहने तो टिपला. रोहित १६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून २८ धावांत माघारी परतला. शादाब खानने त्याच्या पहिल्याच षटकात भारताचा दुसरा सलामीवीर लोकेशला ( २८) माघारी जाण्यास भाग पाडले. भारताला ८ धावांच्या अंतराने दोन धक्के बसले. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १४ वेळा ५०+ भागीदारी करण्याचा विक्रम रोहित-लोकेशने नावावर केला. त्यांनी आयर्लंडच्या पॉल स्टीर्लिंग व केव्हिन ओ'ब्रायन यांचा ( १३) विक्रम मोडला.
सूर्यकुमार यादव व विराट कोहलीने डाव सावरला होता, परंतु षटकार मारण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार ( १३) झेलबाद झाला. विराट व त्याने २९ धावांची भागीदारी केली. भारताने पहिल्या १० षटकांत ३ बाद ९३ धावा केल्या. भारताने १०.४ षटकांत शतक पूर्ण केले आणि पाकिस्तानविरुद्धचे ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारताचे सर्वात जलद शतक ठरले. रिषभ पंतला आज मोठी खेळी करण्याची संधी होती, पंरतु तो १४ धावा करून शादाबच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने विराटसह २५ चेंडूंत ३५ धावा केल्या. हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला. विराट आज चांगल्या फॉर्मात दिसला... त्याने ३६ चेंडूंत अर्धशतक झळकावले. आज संधी मिळालेला दीपक हुडा १६ धावांवर बाद झाला. विराटसह त्याने २४ चेंडूंत ३७ धावांची भागीदारी केली.
Web Title: T20 Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : India scores their fastest 100 runs against Pakistan in T20is - 10.4 overs, Fifty by Virat Kohli in 36 balls, break rohit sharma record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.