Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : Urvashi Rautela पुन्हा मॅच पाहायला आली, फॅन्सने रिषभ पंतला चिमटा काढत मीम्सचा पाऊस पाडला

T20 Asia Cup 2022 Super 4 India vs Pakistan Match Highlights : भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी पुन्हा बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला स्टेडियमवर उपस्थित होती. यावेळी नेटिझन्सनी रिषभ पंतला चिमटे काढून मीम्सचा पाऊस पाडला.  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 10:16 PM2022-09-04T22:16:10+5:302022-09-04T22:16:33+5:30

whatsapp join usJoin us
T20 Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : Urvashi Rautela Once Again Attends India vs Pakistan Clash as Fans Root For Rishabh Pant, memes viral  | Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : Urvashi Rautela पुन्हा मॅच पाहायला आली, फॅन्सने रिषभ पंतला चिमटा काढत मीम्सचा पाऊस पाडला

Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : Urvashi Rautela पुन्हा मॅच पाहायला आली, फॅन्सने रिषभ पंतला चिमटा काढत मीम्सचा पाऊस पाडला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Vs Pakistan Super 4 Live Match Highlight :  रोहित शर्मा ( Rohit Sharma)  व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी भारताला स्फोटक सुरुवात करून दिली. त्यानंतर विराट कोहलीची ( Virat Kohli) बॅट तळपली. त्याने ४४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार मारून ६० धावा चोपून भारताचा अडखडलेला डाव सावरला. रिषभ पंतला आज मोठी खेळी करण्याची संधी होती, परंतु त्याने निराश केले. दरम्यान हाही सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) स्टेडियमवर उपस्थित होती आणि रिषभ अपयशी ठरल्यावर नेटिझन्सने मीम्सचा पाऊस पाडला.


रोहित शर्मा व लोकेश राहुल यांनी पहिल्याच षटकात आपला इरादा दाखवून दिला. या दोघांनी ४.२ षटकांत फलकावर ५० धावा चढवल्या.  रोहित १६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार खेचून २८ धावांत माघारी परतला. ८ धावांच्या अंतराने लोकेश ( २८) माघारी परतला. सूर्यकुमार यादव व विराट कोहलीने डाव सावरला होता, परंतु षटकार मारण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार ( १३) झेलबाद झाला. विराट व त्याने २९ धावांची भागीदारी केली. रिषभ पंतला आज मोठी खेळी करण्याची संधी होती, पंरतु तो १४ धावा करून शादाबच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. हार्दिक पांड्या शून्यावर बाद झाला. विराट आज चांगल्या फॉर्मात दिसला. त्याने ३६ चेंडूंत ट्वेंटी-२०तील ३२वे अर्धशतक झळकावले. त्याने रोहितचा ३१ अर्धशतकांचा विक्रम मोडला. दीपक हुडाने काही सुरेख फटके मारले, परंतु तो १६ धावांवर बाद झाला. विराटसह त्याने २४ चेंडूंत ३७ धावांची भागीदारी केली. रवी बिश्नोईने अखेरच्या दोन चेंडूंवर चौकार खेचून भारताला ७ बाद १८१ धावांपर्यंत मजल मारून दिली. 

भन्नाट मीम्स...






प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून चांगली सुरूवात पाहायला मिळाली, परंतु आज संधी मिळालेल्या रवी बिश्नोईने भारताला पहिले यश मिळवून दिले. चौथ्या षटकात त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम (  १४) याला रोहितकरवी झेलबाद केले. बाबर माघारी जात असताना मैदानावरील अम्पायरने त्याला थांबवले व नो बॉल तपासायला लागला. पाकिस्तानी चाहत्यांना करिष्म्याची अपेक्षा होती, परंतु बिश्नोईने टाकलेला चेंडू वैध होता अन् पाकिस्तानला २२ धावांवर पहिला धक्का बसला. रिझवान व फाखर जमान यांनी ४१ धावांची भागीदारी करताना पाकिस्तानचा डाव सावरला होता. युजवेंद्र चहलने चतुराईने ही भागीदारी संपुष्टात आणताना फाखरला ( १५) बाद केले. पाकिस्तानला ६३ धावांवर दुसरा धक्का बसला. 

Web Title: T20 Asia Cup 2022 Super 4 Ind vs Pak Highlight : Urvashi Rautela Once Again Attends India vs Pakistan Clash as Fans Root For Rishabh Pant, memes viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.