India Vs Pakistan Super 4 Live Match Highlight : रोहित शर्मा ( Rohit Sharma) व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी भारताला स्फोटक सुरुवात करून दिली. त्यानंतर विराट कोहलीची ( Virat Kohli) बॅट तळपली. त्याने ४४ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार मारून ६० धावा चोपून भारताचा अडखडलेला डाव सावरला. रिषभ पंतला आज मोठी खेळी करण्याची संधी होती, परंतु त्याने निराश केले. दरम्यान हाही सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) स्टेडियमवर उपस्थित होती आणि रिषभ अपयशी ठरल्यावर नेटिझन्सने मीम्सचा पाऊस पाडला.
भन्नाट मीम्स...
प्रत्युत्तरात पाकिस्तानकडून चांगली सुरूवात पाहायला मिळाली, परंतु आज संधी मिळालेल्या रवी बिश्नोईने भारताला पहिले यश मिळवून दिले. चौथ्या षटकात त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( १४) याला रोहितकरवी झेलबाद केले. बाबर माघारी जात असताना मैदानावरील अम्पायरने त्याला थांबवले व नो बॉल तपासायला लागला. पाकिस्तानी चाहत्यांना करिष्म्याची अपेक्षा होती, परंतु बिश्नोईने टाकलेला चेंडू वैध होता अन् पाकिस्तानला २२ धावांवर पहिला धक्का बसला. रिझवान व फाखर जमान यांनी ४१ धावांची भागीदारी करताना पाकिस्तानचा डाव सावरला होता. युजवेंद्र चहलने चतुराईने ही भागीदारी संपुष्टात आणताना फाखरला ( १५) बाद केले. पाकिस्तानला ६३ धावांवर दुसरा धक्का बसला.